पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

करितोस तो बस नाहीं. तूं शेवटास पोचेपर्यंत टिकून राहणार नाहींस. तुजमध्ये देवाच्या लेक- राचा आनंद नाहीं. येशूवरील तुझा विश्वास धर- सोडीचा आहे." परंतु देवाचा आत्मा आम्हांस असें सांगतो कीं, आह्मी कांहींच नाहीं, तर ख्रीस्त अवघ्यांत अवघा आहे. यास्तव आपण असें जाणावें कीं, ख्रीस्ताला आपण धरितों म्हणून आमचें तारण होतें असें नाहीं, तर ख्रीस्तच आम्हांला तारितो. तसेंच ख्रीस्तामध्ये आम्ही आनंदित आहों म्हणून आमचे तारण होतें असें नाहीं, तर ख्रीस्तच आमचा तारणारा आहे. त्याप्रमाणें खीस्ताव- रील आमचा विश्वास आमच्या तारणास साधनभूत आहे तरी तो आमचा त्राता नव्हे, तर ख्रीस्त हांच