पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
येशूकडे पाहत राहणे.
ख्रिस्ती मनुष्यास बोध.

 आमच्या तारणाच्या गोष्टींत पवित्र आत्म्याचा हा एक कार्यभाग आहे कीं, तो आमची दृष्टि आमच्यावरून काढून आम्हांस येशूकडे पाहण्यास लावितो. परंतु सैतानाचें काम ह्याच्याविरुद्ध आहे. कारण तो आम्हांस आमच्याविषयीं विचार करण्यास लावण्याचा यत्न करीत असतो. तो आमच्या मनांत अशी सूचना करितो कीं, " तुझीं पापें इतकी आहेत कीं, त्यांची तुला क्षमा होणार नाहीं. तुझ्याठायीं विश्वास नाहीं ; तूं जो पश्चात्ताप