पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तर ईश्वराची इच्छा काय आहे ती जाणी. ती त्याच्या शास्त्रांत प्रगट केली आहे. परमेश्वराची भ क्ति आत्म्यानें व सत्यतेने केली पाहिजे, कारण पर- मेश्वर निराकार परमात्मा आहे, व तो सत्य आहे. मनुष्ये पापी आहेत, त्यांच्या पापांची क्षमा झाली पाहिजे, त्याशिवाय परमेश्वर त्यांस जवळ घेणारनाहीं. याकरितां त्याने आपला एकुलता पुत्र प्रभु येशू ख्री- स्त जगांत पाठविला. त्याने आह्मांकरितां प्रायश्विच केले. जे त्याजवर विश्वास ठेवितात त्यांची महा विघ्ने दूर होतात. तीं पाप व पापाचा दंड ह्मणजे अ- क्षय नरकवास हीं आहेत. येशूच्या पुण्याने पापाची क्षमा मिळते, व नरकवास चुकतो; मरणाचें भय दूर होते. येशूवर विश्वास ठेवणारास देवाचा पवित्र आ त्मा मिळतो, तो आत्मा आमचे मळीण अंतःकरण शुद्ध करितो, आह्मास पवित्र आचरण करायास शक्ति देतो; हेंच तारण आहे. प्रिय मित्रहो, ह्या गोष्टीचा विचार करा. ख्रिस्ती शास्त्र वाचून पाहा. प्रभु येशूचे गुण, सामर्थ्य, कर्मों, दया व प्रीति यांचा अनुभव घ्या. त्याचा उपदेश ऐका. "त्याजमध्यें ज्ञा- नाचे व बुद्धीचे अवघे संग्रह आहेत." (कल. २: ३).