पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चाहुलींचा खेळ झाल्यावर मुलें जशीं त्यांस ढकलून देऊन हुर्यो! करितात तसें तुह्मी मोरया ! ह्मणून त्या- ला पाण्यांत टाकितां कीं नाहीं ? इतका पैसा खर्चा - चा, नाच तमाशे करावे. वेळ दवडावा, जागरणे क- राव, प्रकृति विघडून घ्यावी व शेवटी गणोवाला त्याचा कांहीं अपराध नसतां सन्याशाप्रमाणें जलस- - माध द्यावी हें न्यायदृष्ट्या तरी योग्य आहे काय?
 गणपतीला हिंदु लोक विद्येचा देव समजतात, परंतु त्याच्या विद्येचें उदाहरण एकही त्याच्या चरि- त्रांत दृष्टीस पडत नाहीं. त्याने कोणती विद्या शिक- विली? त्यानें नास्तिक मत ( बौद्ध मत ) शिकविले अशी कथा पुराणांतरी आहे. तसेच सर्व मंगल का - ·र्यांच्या आरंभी त्याचे पूजन करितात, व ग्रंथारंभ त्याचे नमन लिहितात, परंतु ह्या दोन्ही चाली जुन्या वैदिक कालांत व वैदिक ग्रंथांत कोठे आढळत ना- हीत. ऋग्वेदाच्या आरंभी "श्रीगणेशायनमः" नाहीं व वेदांत, सांख्य, योग इ० शास्त्रांच्याही आरंभीं नाहीं.
 पण हा सर्वच प्रकार अथपासून इतिपर्यंत व्यर्थ आहे, यांत धर्म ह्मणून कांहीं नाहीं. ईश्वराने असें करण्याविषयीं मनुष्यांस कोठे आज्ञा दिली नाही.