पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या एका दांताविषयींची गोष्ट पाहा. शिव पार्वती एकांती असतां त्यांनी गणोवाला द्वार रक्षणार्थ ठेविलें होते, इतक्यांत परशरामाची स्वारी शिवदर्शनास आली व त्याला गणपतीने आंत जाण्याचा प्रतिबंध केला, ह्मणून परशरामाने बुकी मारून त्याचा एक दांत पा डला. अहो, ज्याला तुह्मी विनायक व विघ्नहर्ता ह्मण- तां त्याला आपणावर आलेली ही दोन विघ्नें निवारण करितां आली नाहींत, तो तुमचीं बहुत विघ्ने कशी दूर करील ? मित्रहो, विचार करा.
 गणेशचतुर्थीच्या दिवशीं तुह्मी चंद्रदर्शन घेत नाहीं,. कारण तसें केल्याने तुह्मावर चोरीचा आळ येईल अ-- सा चंद्रास गणपतीचा शाप आहे असें तुह्मी ह्मणतां, पण असें पाहा कीं, तुमच्या शिवाय शेंकडों व हजारों लोक त्या दिवशी चंद्राला पाहतात त्यांजवर कधी असा आळ येत नाहीं. तेव्हां ही गोष्ट कशी खरी मानावो?
 गणपतीला कांहीं दिवस घरांत ठेवल्यावर तुह्मी त्याला बाहेर नेऊन पाण्यांत टाकतां, हे एक त्या विघ्न- हर्त्यावर विघ्नच नव्हे काय? आणि तुह्माला त्याची गरज नाहीं काय? गणपति बुडाल्यावर तुमचीं विन्ने कोण हरण करील! हा पोर खेळ नव्हे काय ? बाहुला