पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पार्वतीच्या अंगाच्या मळीपासून झाला, व तिचें द्वार रक्षीत असतां शिवाने बाहेरून येऊन तो आपणाला आंत जाऊं देईना ह्मणून त्याचा शिरच्छेद केला; पुढें पार्वतीने याजकरितां शोक केला ह्मणूनच हत्तीचे मस्तक आणून त्याला लाविलें. ह्यावरून त्याला गजानन असें नांव पडले व तें तुह्मी व्यास भूषणप्रद मानून त्याचें दर्शन घेते वेळीं "दे गजानना" असे ह्मणतां, परंतु वैष्णवपंथी यावरून त्याला "नरपशु" ह्मणतात. विचार सागर नामक गुजराथी ग्रंथांत शिवाचे वर्णन करितांना असे झटले आहे की-

"तेनो पुत्र गणेशजी देवो ।
रूप विलक्षण नरपशु जेवो ॥"

 वाचकहो, ज्याला तुह्मी देव मानितां त्याच्या उप- तीची कायहो ही कथा ! तो तुमच्या कोणत्या कार्या- साठी ह्मणून अशाप्रकारे उत्पन्न झाला ! अशा क- थेवर तुमचा विश्वास तरी कसा बसतो ? जर पार्वतीला आपल्या अंगाच्या मळीचा सजीव पुतळा करितां आला, तर शिवाने त्याचें मस्तक छेदल्यावर पुनः ते निर्माण करायास तिला शक्ति नव्हती काय ? अथवा शिवा- लाही तसें करण्याचे सामर्थ्य नव्हते काय ? तसेच