पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वड आहे. तुकारामानींही याविषयीं लटले आहे की,
गनोबा विकराळ | लाडू मोदकांचा काळ ||
 गणपतीस मेवामिठाईची इतकी गोडी होती कीं, एकदां त्याचा बाप महादेव याजवर कोणी वैरी चढाई करून येत असतां त्यास निवारायास त्याने ह्या आ पल्या पुत्रास पाठविलें, परंतु त्या शत्रुने याच्या पुढें मिठाईची रास ठेविली, तिला तो इतका लुब्ध झाला कीं, शत्रु बापावर चढाई करून केव्हां गेला हेंही त्याला समजले नाहीं, व तेव्हांपासून त्याचें जें दोद वाढले, तें अद्याप झडलें नाहीं !
 गणपतीपुढे भजन, कीर्त्तन, पुराण चालतें इत- केच नाहीं, तर कळवंतिणीचा नाच, रांडांच्या बैठका, जुगार, सोंगट्यांचे खेळ, असेही प्रकार चालतात. मुंबईत गणपतीच्या नव्या नव्या तन्हा निघतात, त्यांत आह्मी एकदां अशी एक तन्हा पाहिली कीं, गण- पतीच्या हातांत वाटली दिली होती, तेव्हां भक्तही बाटलीतील तीर्थं लंबोदराचा प्रसाद मानून प्राशन करीत असतील हे उघडच आहे.
 गणपतीची उत्पत्ति तर सर्वांस ठाऊकच आहे. तो.