पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारागीर मिळवितो. गणपति घरी आणिल्यावर त्या- च्यावर टीका होऊ लागतात. कोणी ह्मणतो, ह्या ग- णपतीचे ध्यान चांगले साधले. कोणी ह्मणतो, आ- सनाचा आव फार चांगला झाला, पण अंमळ सोड त्रिनसली. अणखी एकजण ह्मणतो, ह्या गणोत्राचे पोट तर खपाड्यास गेले. दुसऱ्या गणपतीला पाहून लणतो याचे दोंद भले मोठे झालें. आतां याच्या य जमानास काय कमी आहे ? याप्रमाणे त्या बापड्या देवावर टीका चालतात, व त्या तो मुकाट्याने ऐकत बसतो. त्याच्या पूजेस आरंभ होण्यापूर्वी त्याला बराच वेळ एकीकडे बसावें लागतें, कारण यजमान व घर- चीं माणसें त्याच्यासाठी आरास करण्यांत गुंतलेली असतात. पूजेच्या आरंभी प्राणप्रतिष्ठा होते, ह्मणजे ब्राह्मण मंत्रांच्या योगाने व्याजमध्ये देवत्व आणितात, पण तें आल्याचे लक्षण कांहींच दिसत नाहीं. पूजे- च्या आरंभी इतर देवांस जसें स्नान घालतात तसें यास घालीत नाहींत, कारण जलस्नानाने गणोबाची सर्व कळा जाईल अशी भक्तांस भीति असते. गण- पतीच्या पूजेत विशेष हें आहे की त्याला २१ मो- दकांचा नैवेद्य लागतो. त्याला लाडवांची मोठी आ-