पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२३

गावें लागेल. तर अशा मोव्या संकटापासून लोकांस सो- डविण्याकरितां देवाच्या संकल्पाप्रमाणे येशू ख्रीस्त ज- गांत आला तेव्हां त्यानें अनेक प्रकारचें दुःख परिहार करून, दुःखाचें कारण जे पाप तेंही परिहार करण्याची आपणाला शक्ति आहे असें सिद्ध केलें.
 अणखी येशू स्वीस्ताच्या कामासंबंधी तुह्मास असें समजलें पाहिजे कीं, पाप निवारण करण्यासाठीं तो पा- प्यांचा जामीन झाला, मनुष्याला देवाकडून पापाची क्षमा मिळण्याकरितां त्याने आपला जीव वळीदानरूप दिला. आणि मनुष्यास पापाच्या योग्य शिक्षेपासून ह्मणजे नरकदंडापासून सोडवायास त्यानें स्वतां ती शिक्षा भोगिली. दुसरी गोष्ट तुझी ध्यानांत आणा कीं, पाप निवारण करणारा एकटा येशू स्वीस्तच आहे. रोग वगैरे अरिष्टें दूर करणारा त्याप्रमाणें दुसरा कोणी नाहीं. आणि रोग वगैरेंचें कारण जें पाप तेंही दूर करणारा दुस- रा नाहीं. मनुष्यांचा तारणारा हाच आहे. त्याजवर आ- सर्वांनीं विश्वास ठेविला पाहिजे. त्याविषयीं देवाचा संकल्प असा आहे की ' जो कोणी त्याजवर विश्वास ठेवणार नाहीं त्याजवर देवाचा कोप सदासर्वकाल राहील.