पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२

काढली. मग येशू मोठ्याने ओरडला, लाजारसा, बाहेर ये. तेव्हां जो मेला होता तो बाहेर आला, त्याचे पाय व हात वेष्टणांनी बांधलेले व तोंड रुमालानें वेष्ट- लेलें होतें. येशूनें त्यांस ह्यटलें, त्याला मोकळे करा व जाऊं द्या. (यो० ११: १ – ४४. )
 प्रिय बंधुजनहो, वरील गोष्टी वाचून तुह्मास समजेल कीं, येशूनें अंधळे लंगडे इत्यादिकांस बरे केलें, नानाप्र- कारचे रोग्यांस आरोग्य दिले, भूतग्रस्तांस बरें केलें, वाऱ्याचें तुफान बंद केलें, खवळलेला समुद्र शांत केला, आणि मेलेल्यांसही उठविलें.
 तर अशा प्रकारचे चमत्कार येशूनें अशासाठी केले कीं आपण देवापासून आलेला तारणारा आहे असें लो- कांनी जाणावें ह्मणून.
 अणखी असें पाहा कीं, ह्या जगांत मनुष्यास नाना प्रकारची दुःखें भोगावी लागतात, आणि तीं सर्व पापा- मुळे त्यांजवर येतात. देव पापाचा द्वेष करितो, आणि याचे प्रमाण हेंच आहे कीं तो मनुष्यावर नाना प्रकारची दुःखें पाठवितो. आणि शास्त्रांत असें सांगितलं आहे कीं, मरणानंतर दुष्ट लोकांस नरकांत अपार व अनंत दुःख भो-