पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१

आहे व तुला बोलावितो. हें ऐकतांच ती जलदी उठून त्याकडे आली. मग मारया जेथे येशू होता तेथें आल्या- वर त्याला पाहून त्याच्या पायां पडली व त्याला झ- णाली, प्रभू, तूं एथें असतास तर माझा भाऊ मेला नस- ता. तेव्हां येशू तिला रडतां आणि जे यहूदी तिच्या जवळ मिळाले त्यांसही रडतां पाहून, आत्म्यांत कन्हला व व्याकुल झाला; आणि बोलला, तुह्मी त्याला कोठें ठे- विलें ? ते झणाले, प्रभू, येऊन पाहा. येशू रडला. ते- व्हां यहूदी बोलले, पाहा, याची त्याजवर केवढी प्रीति होती. पण त्यांतील कित्येक ह्मणाले, ज्यानें अंधळ्याचे डोळे उघडिले त्याला हा मरूं नये असेही करण्याची शक्ति नव्हती काय ? मग येशू पुन्हा आत्म्यांत कन्हून कबरेकडे आला. ती तर गुहा होती, आणि तिच्या तोंडी धोंड ठेविली होती. येशूनें झटलें कीं, घोंड काढा. मेलेल्याची बहीण मार्था त्याला ह्मणाली, प्रभू, आतां त्याला घाण आली असेल, कारण चार दिवस झाले आहेत. येशूने तिला झटलें, जर तूं विश्वास धरशील तर देवाचा महिमा पाहशील, असें म्या तुला सांगितलें कीं नाहीं ? मग तो मेलेला ठेवला होता तेथून त्यांनी घोंड