पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

तेथे दोन दिवस राहिला. नंतर त्याने शिष्यांस ह्यटलें, आपण यहूदांत पुनः जाऊं. मग तेथें आल्यावर लाजारसा- ला कबरेंत ठेविलें असें त्याला समजलें. यहूद्यांतील बहुत लोक मार्था व मारया यांचें भावाविषयीं समाधान करा- यास आले होते. येशू आला आहे. हे ऐकतांच माथ जाऊन त्याला भेटली. आणि त्याला ह्मणाली कीं, प्रभू तूं एथें असतास तर माझा भाऊ मेला नसता. तरी आतां जें कांहीं तूं देवाजवळ मागशील तें देव तुला देईल. येशूनें तिला झटलें, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला ह्मणाली, शेवटल्या दिवशी पुन्हा उठण्याचे वेळेस तो पुन्हा उठेल हें मला ठाऊक आहे. येशूनें तिला झटलें, पुन्हा उठणें व जीवन मी आहें, जो मज- वर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी वांचेल. आणि कोणी वांचणारा व मजवर विश्वास ठेवणारा कधीहि मर- णार नाहीं, याचा तुला विश्वास आहे काय ? ती त्याला ह्मणाली, होय प्रभू, जो देवाचा पुत्र स्त्रीस्त जगांत ये- णार होता तोच तूं आहेस, असा मला विश्वास झालेला आहे. असे बोलून ती निघाली आणि आपली बहीण मारया इला एकांतीं बोलावून ह्मणाली, गुरु आला