पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९

ड्यांत जाऊन वर्त्तमान सांगितलें, तेव्हां काय झालें हैं पाहायास लोक बाहेर आले. आणि येशू जवळ आल्या- वर सैन्य लागलेला भूतग्रस्त वस्त्र ल्यालेला व शुद्धी- वर आलेला व येशूच्या पायांजवळ बसलेला असा त्यांनीं पाहिला. येशू तारवांत वसतांना भूत लागलेल्या माणसानें म्या आपणाजवळ असावे अशी त्याला विनंती केली. परंतु येशूनें त्याला येऊं दिलें नाहीं. तर झटलें कीं, तूं घरीं आपल्या माणसांकडे जा, आणि प्रभूनें तु- जवर दया करून तुजसाठीं जें जें केलें तें त्यांस सांग. तेव्हां तो निघाला आणि आपणासाठी येशूनें जें जें केलें तें दकापलांत सांगूं लागला, आणि सर्वांस आश्चर्य वा- टलें. ( मात्थी. ८. २८ - ३४; मार्क ५. १ - २०; लूक ८.० २६-३९. )


९. येशूनें लाजारसास जीवंत केलें.

 बेथानी गांवांतील मारया व मार्था झा दोघी बहिणी- चा भाऊ लाजारस हा रोगी पडला होता. तेव्हां त्यांनी येशूला सांगून पाठविलें कीं, हे प्रभू, ज्यावर तूं प्रीति करितोस तो रोगी आहे. येशूनें तें ऐकून जेथें तो होता