पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
८. येशूनें एका भूतग्रस्त मनुष्यास बरें केलें.

 येशू समुद्राच्या पलीकडे गादरेकरांच्या देशात गेला असतां तारवांतून उतरतांच अशुद्ध आत्मा ला- गलेला असा माणूस थंड्यांतून निघून त्याला भेटला.. तो एवढा विकराळ होता की त्या वाटेने कोणाच्यानें जाववेना. तो वस्त्र नेसत नसे व घर सोडून थड्यांमध्यें राहत असे. लोकांनी त्याला सांखळ्यांनी व बेड्यांनी बांधून ठेवलें असतांही तो बंधने तोडी. त्याला कोणा- च्यानें वश करवेना. तो नेहमी रात्रंदिवस डोंगरांत व थड्यांत ओरडत असे, आणि आपणाला धोंड्यांनी ठेचून वेत असे. तो येशूला दुरून पाहून धांवला व त्याला नमला, आणि मोठ्याने ओरडून बोलला, हे येशू, परा- त्पर देवाच्या पुत्रा, माझा व तुझा काय संबंध? मी तुला विनंती करितों कीं त्वां मला पिडूं नये. येशूने त्याला पु- सलें कीं, तुझें नांव काय? त्याने झटलें, सैन्य; कांक त्यामध्यें पुष्कळ भूतें गेली होती. येशूनें भूतांस त्या मा-- णसांतून निघण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणें तीं निघालीं तें पाहून तेथें करें चारणारे होते त्यांनी नगरांत व खे-