पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७

आहे हें तुम्हास ठाऊक नाहीं, हें मोठे आश्चर्य आहे. आम्हास तर ठाऊक आहे कीं, देव पाप्यांचें ऐकत ना- हीं, तर कोणी देवाचा भक्त असल्यास व त्याच्या इच्छे- प्रमाणें केल्यास त्याचें तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे को- णी एकाने उघडिले असें कधींहि ऐकण्यांत आलें नाहीं. जर हा देवापासून आला नसता तर याच्याने कांहीं न करवतें. त्यांनीं त्याला उत्तर दिलें कीं, तूं अगदी पापा- मध्ये जन्मलास आणि तूं आम्हास उपदेश करितोस का - य ? मग त्यांनी त्याला बाहेर घालविलें.
 त्यांनीं त्याला बाहेर घालविलें हैं येशूनें ऐकिलें; नं- तर तो मिळाल्यावर त्यानें त्याला झटलें, तूं देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितोस काय ? त्यानें उत्तर दिलें कीं, हे प्रभू, म्या त्यावर विश्वास ठेवावा ह्मणून तो कोण आहे, सांग. तेव्हां येशू त्याला म्हणाला, त्वां त्याला पाहिलें आहे व तुजशीं बोलणारा तोच आहे. तेव्हां त्यानें म्हटलें, हे प्रभू, मी विश्वास ठेवितों; मग त्यानें त्याला नमन केलें. ( यो. ९. २.३८.)