पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६

असें झटलें, कारण कीं हा स्त्रीस्त असें जर कोणी प- त्करील तर त्याला सर्भेतून घालवावें असा यहूद्यांनी ए- कोपा केला होता. यामुळे त्याच्या आईबापांनी झटलें, कीं, तो प्रौढ आहे, त्याला विचारा. मग जो माणूस अं- धळा होता त्याला त्यांनीं फिरून बोलाविलें, व त्याला झटलें, देवाचे गौरव कर, तो माणूस पापी आहे हें आ- झास ठाऊक आहे. यावरून त्यानें उत्तर दिलें कीं, तो पापी आहे किंवा नाहीं हें मला ठाऊक नाहीं, एवढें म- ला ठाऊक आहे कीं, मी अंधळा होतों तो आतां पाह- तों. मग त्यांनीं त्याला फिरून झटलें, त्यानें तुला काय केलें ? त्यानें तुझे डोळे कसे उघडिले ? त्यानें त्यांस उ- त्तर दिलें कीं, म्यां तुह्मास आतां सांगितलें असतां तुझी ऐकलें नाहीं; फिरून ऐकायास कां इच्छितां ? तुझीहि त्याचे शिष्य व्हायास इच्छितां काय ? तेव्हां ते त्याची अशी निंदा करू लागले की, तूं त्याचा शिष्य आहेस, आह्मी तर मोश्याचे शिष्य आहों; देव मोश्याशीं वोल- ला हैं आम्हांस ठाऊक आहे, परंतु हा कोठला आहे हैं ठाऊक नाहीं. त्या माणसानें त्यांस उत्तर दिलें कीं, त्यानें माझे डोळे उघडिले असें असतांहि तो कोठला