पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४

जगाचा उजेड आहें. असें बोलून तो भूमीवर थुंकला, मग थुंक्यानें चिखल करून त्यानें तो चिखल त्या अंध- ळ्याच्या डोळ्यांवर लेपिला; आणि त्याला झटलें, जा, शिलोहाम तळ्यांत धू; शिलोहाम ह्मणजे पाठविलेला; म- ग जाऊन धुतल्यावर तो पहात आला. तेव्हां शेजारी व ज्यांनीं त्याला अंधळा असें पूर्वी पाहिलें होतें ते ह्मणाले, जो भीक मागत बसत असे तो हाच नव्हेना ? कित्येक बोलले तोच हा आहे, आणि दुसरे बोलले त्याच्या सा- रिखा आहे; तो बोलला, मी तोच आहें. तेव्हां त्यांनी त्याला झटलें, तुझे डोळे कसे उघडले ? त्यानें उत्तर दि- लें कीं, येशू नामें माणसाने चिखल केला व माझ्या डो- ळ्यांवर लेपून मला सांगितलें, शिलोहाम तळ्यांत जाऊन धू, तेव्हां जाऊन धुतल्यावर मला दिसूं लागलें. मग त्यां- नी त्याला झटलें, तो कोठे आहे ? तो बोलला, मला ठाऊक नाहीं.
 जो पूर्वी अंधळा होता त्याला परोश्यांकडे नेलें. आ- णि येशूनें चिखल करून त्याचे डोळे उघडले, तेव्हां शा- ब्वाथ दिवस होता. मग तुला कसें दिसूं लागलें, हैं प- रोश्यांनीहि त्याला अणखी पुसलें, तेव्हां तो त्यांस -