पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

खांदेले तर उभे राहिले, आणि तो बोलला, तरण्या, मी तुला सांगतों ऊठ. तेव्हां तो मेलेला उठून बसला व बो- लूं लागला; मग त्यानें त्याला त्याच्या आईजवळ दिलें. सर्वांस तर भय प्राप्त झालें, आणि ते देवाची स्तुति क- रीत बोलले कीं, आह्मांमध्ये मोठा भविष्यवादी उठला आहे, आणि देवानें आपल्या लोकांची भेट घेतली आहे. ( लूक ७. ११ - १६ . )


७. येशूनें एका जन्मांध मनुष्यास दृष्टि दिली.

 एकदां येशू जात असतां त्यानें जन्मांध माणूस पाहि- ला. तेव्हां त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलें कीं, हे गु- रू, ज्या पापामुळे हा असा अंधळा जन्मला तें कोणी केलें, यानें किंवा याच्या आईबापांनी? येशूनें उत्तर दि- लें कीं, यानें किंवा याच्या आईबापांनी पाप केलें असें नाहीं, तर याकडून देवाचीं कामें प्रगट व्हावी ह्मणून अ- सा जन्मला. दिवस आहे तोपर्यंत माझ्या पाठविणाऱ्या- चीं कामें मला केली पाहिजेत; रात्र येती, तेव्हां कोणा- च्यानें काम करवत नाहीं. मी जगांत आहे तोपर्यंत मी