पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

वारा मोठा असें पाहून तो भ्याला, आणि बुडूं लागल्यावर ओरडत बोलला, हे प्रभू, मला तार. तेव्हांच येशूनें हात लांबवून त्याला धरिलें व त्याला झटलें अल्पविश्वासी, त्वां संशय कां धरिला? मग त्यांनी त्यास आनंदानें तारवावर घेतलें. आणि ते तारवांत बसल्यावर वारा राहिला. मग तारवांतलीं माणसें येऊन त्याच्या पायां पडून ह्मणाली, तूं देवाचा पुत्र आहेस खरा. आणि जेथें त्यांस जायाचें होतें त्या ठिकाणी तारूं लागलेच पोंचलें. (मात्थी १४.२२–३३; मार्क ६.४५ - ५२; यो० ६.१४-२१.)


६. येशूनें एका मृत मनुष्यास जीवंत केलें.

 एकदां येशू नाईन नांवाच्या गांवास जात होता, ते- व्हां तो नगराच्या वेशीजवळ आल्यावर कोणी एका मे- लेल्या मनुष्याचें प्रेत बाहेर नेत होते; तो आपल्या आ- ईचा एकुलता एक पुत्र असून ती विधवा होती. तिच्या संगती नगरांतील मोठा समुदाय होता. तिला पाहून प्र- भूला तिचा कळवळा आला व तो तिला ह्मणाला, रडूं नको. आणि जवळ जाऊन त्यानें तिरडीस हात लावला.