पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११
५. येशू समुद्रावर चालला, आणि त्यानें वादळ शांत केलें.

वरच्या गोष्टींत सांगितल्याप्रमाणें शिष्य तारवांत व- सून निघाल्यावर येशू प्रार्थना करायास डोंगरांत गेला. इतक्यांत अंधार पडला व तें तारूं समुद्राच्या मध्यें हो- तें, आणि तो एकटा भूमीवर होता. आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळला, वारा त्यांस तोंडचा होता, ह्मणून तारूं लाटांनी डळमळू लागलें. आणि ते वल्ही मारतां थकून गेले होते असें येशूनें पाहिलें. नंतर तो समुद्रावर चालून त्यांजकडे आला, व त्यांच्या पलीकडे जाण्याचा रोख दाखविला. परंतु जेव्हां त्यांनी त्याला तारवाकडे येतां पाहिलें तेव्हां भूत आहे असें समजून ते ओरडले, कारण ते सर्व त्याला पाहून घाबरले होते; तेव्हांच तो त्यांशीं बोलूं लागला व त्यांस ह्मणाला, मी आहें, धीर धरा, भिऊं नका. [ त्याच्या शिष्यांपैकीं] पेत्रस त्यास ह्मणाला, हे प्रभू, तूं असलास तर पाण्यावरून तुजकडे यायास मला सांग. त्यानें सांगितलें, ये; तेव्हां पेत्रस ये- शूकडे जायास तारवांतून उतरून पाण्यावर चालला. पण