पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वॅ. ] फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. ९७ बोरबोन घराण्यांतील पहिला राजा नॅव्हेरीचा हेन्री हा दूरदर्शी असून इतर परिस्थिति पाहून आचरण करणारा होता. फ्रान्समधील ह्युगे- नाट पक्षाचा हा पुढारी असून त्याचें जरी त्यास पूर्ण पाठबळ होतें, तरी त्याच्या अनुयायांची संख्या फारच कमी असल्यामुळें फ्रान्समधील कॅथ- लीकपंथीय बहुजनसमाजाचें आपणाकडे लक्ष वेधून घेण्यास काय करावें याविषयीं त्याचे विचार सुरू होते. हेन्रीच्या विरुद्ध स्थापन झालेल्या गाईझपक्षाकडील कटवाल्या लोकांनीं त्यास राज्यपद मिळू नये म्हणून जोराची खटपट चालविली होती; व या कटवाल्या लोकांबरोबर लढून हेन्रीनें बऱ्याच लढायांत त्यांचा पराभवही केलेला होता; परंतु १५९० च्या सुमारास या कटवाल्या लोकांनीं स्पेनचा राजा २ रा फिलीप याची -मदत घेण्याचें ठरविलें. तेव्हां आतां आपला टिकाव लागणार नाहीं, व आपण प्रॉटेस्टंट पंथीय असल्यामुळे, आपणाविषयीं फ्रान्समधील बहुजनसमाजाचें पाठबळ मिळणेही अशक्य होईल हैं. हेन्रीला कळून चुकल्यामुळें त्यानें आतां निराळाच विचार केला. १५९३ मध्ये आपण रोमन कॅथ- ·लीकधर्माचा स्वीकार केला असल्याचें त्यानें जाहीर केलें ! हेन्रीकडून असें जाहीर होतांच त्याच्या अंदाजाप्रमाणे तत्काळ नॅव्हेरीच्या हेन्रीचें धोरण. १५९३. हेन्री रोमन कॅथलीक - सर्व गोष्टी घडून आल्या. रोमनकॅथलीकपंथीय बहु- पंथाचा स्वीकार करतो. जनसमाजास हेन्रीबद्दल आदर वाटूं लागून हाच आपला राजा आहे असें सर्वजण म्हणूं लागले ! हेन्रीच्या पक्षास हलके हलके फ्रान्समधील बहुजनसमाज मिळू लागल्या- मुळें हेन्रीच्या विरुद्ध स्थापन झालेल्या कटास कोणाचीच सहानुभूति न मिळून त्या कटाचा तत्काळ बींमोड झाला, व इतके दिवस फ्रान्सच्या -राजकीय बाबींत गोंधळ माजविणारें धर्मयुद्ध एकदांचें संपुष्टांत आलें. १५९४ च्या फेब्रुवारी महिन्यांत हेन्रीस राज्याभिषेक करण्यांत येऊन त्यानें पॅरिसशहरीं मोठ्या थाटानें प्रवेश केला.