पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण हेन्रीच्या धर्मान्तराबद्दल पुष्कळ टीका करण्यांत येते, परंतु त्याच्या स्वभावाकडे व त्या वेळच्या एकंदर परिस्थितीकडे पाहिलें तर केवळ राज- कीय कारणासाठचिं त्यानें धर्मांतर केलें होतें असें आपणांस दिसून येईल. गादीवर आल्यावर ४ थ्या हेन्रीनें एक जाहीरनामा प्रसिद्ध करून फ्रान्स-- मध्यें धार्मिक बाबीसंबंधानें इतके दिवस चाललेल्या कलहाची योग्य प्रकारें तडजोड करण्याचा प्रयत्न केला. १५९८ च्या एप्रिल महि- न्यांत त्याने नाँट शहरीं असतांना एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्या- वेळच्या कल्पनेप्रमाणें प्रॉटेस्टंट पंथीय लोकांस धार्मिक बाबींत बऱ्याच सवलती दिल्या होत्या असें म्हणण्यास हरकत नाहीं. नॉटच्या जाहीर - नाम्याप्रमाणें फ्रान्समधील प्रॉटेस्टंट पंथीय सरदारांस व लोकांस कांहीं ठरा- विक जागीं त्यांच्या धर्मसमजुतीप्रमाणें प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली, दोन्ही पंथांच्या लोकांना फ्रान्समधील कायदे सारखेच लागू आहेत असें जाहीर करण्य आलें; व याखेरीज प्रॉटेस्टंटपंथीय लोकांची फ्रान्स-- नॉटचा जाहीरनामा. १५९८. मधील लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांच्या संरक्षणार्थ कांही तटबंदीच ला रोशेल ' नांवाचा एक भक्कम किल्ला त्यांच्या ताब्यांत देण्यांत आला. शहरें व 6 ४ थ्या हेन्रीनें फ्रान्समधील धार्मिक प्रश्नाचा अशा रीतीनें निकाल लावल्यावर, फ्रान्सच्या परराष्ट्रीय राजकारणासंबंधानें तो विचार करूं लागला. गेल्या ३० वर्षांत फ्रान्समध्ये सुरू असलेल्या अंदाधुंदीमुळें फ्रान्सची शक्ति बरीच कमी झाली होती, तेव्हां सध्यां तरी स्पेनशीं तह करणेंच बरें असे ४ थ्या हेन्रीला वाटूं लागलें; व लागलींच त्यानें १५९८. मध्येच स्पेनशीं ' व्हेव्हीर्न ' या ठिकाणी तह केला. , अशा प्रकारें परशत्रूपासून स्वस्थता मिळाल्यावर फ्रान्सची अंतर्व्य-