पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण कीं काय अशी भीति वाटूं लागली. तेव्हां नॅव्हेरीच्या हेन्रीस राज्यपद मिळू न देण्याच्या उद्देशानें गाईझ घराण्यांतील हेन्रीनें आपल्या रोमन कॅथलीकपंथीय अनुयायांसह कट रचला. फ्रान्समध्यें अशाप्रकारची बिकट परिस्थिति उत्पन्न झालेली पाहून फ्रान्सचा राजा ३ रा हेन्री यानें दोन्ही पक्षांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न चालविला ! पण तडजोड करून या प्रश्नाचा निकाल लावण्याचें गाईझ घराण्यां- तील हेन्रीस आवडलें नाहीं; व त्यानें राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे आपल्याच हातांत घेण्याची खटपट चालविल्यामुळे पुनः फ्रान्समध्यें अंतस्थ युद्ध होण्याचें घाटूं लागलें. फ्रान्समधील अंतस्थ कलह ( १५८५-८९ ). १५८८ च्या डिसेंबर महिन्यांत ३ या हेन्री राजानें आपल्या हातांतील बरीच सत्ता कमी करून तडजोड करण्याची पुनः खटपट केली. तरी गाईझ घराण्यांतील हेन्रीच्या दुराग्रहानें या बाबतींत कांहींच तड- जोड होणें शक्य दिसेना ! तेव्हां आतां कपटानेंच या युद्धाचा निकाल लावला पाहिजे असें वाटून हेन्री राजानें गाईझ घराण्यांतील हेन्रीस आपल्या राजवाड्यांत बोलावून त्याचा वध करविला. या वधाची बातमी ऐकतांच गाईझच्या पक्षांतील रोमन कॅथलीक क्षुब्ध झाले; व हेन्री राजास पदच्युत करण्यासाठीं त्यांनी मोठी चळवळ सुरू केली, आपल्या राज्यांतील सर्व रोमन कॅथलीक आपणाविरुद्ध उठले आहेत हैं पहातांच हेन्री राजा, नॅव्हेरीचा हेन्री याच्या आश्रयास गेला; पण त्यास येथें स्वस्थता मिळाली नाहीं. एका धर्मवेड्या माणसास हेन्नीराजाचा तिटकारा येऊन त्यानें त्याचा १५८९ च्या ऑगस्ट महिन्यांत खून केला. अशा- रीतीनें फ्रान्सवर राज्य करणारें व्हेलॉसचें राजघराणें संपुष्टांत आलें. आतां फक्त नॅव्हेरीचा हेन्री याचाच कायतो फ्रान्सच्या तक्तावर कायदे- शीर हक्क होता, परंतु गाईझच्या पक्षांतील रोमन कॅथलीक लोकांस तो गादीवर येऊं नये असे अजूनही वाटत होतें !