पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें . ] फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. ९५ मधील सर्व रोमन कॅथलीक चर्चमधून सूचना देण्यासाठी घंटानाद होऊं लागला. अशा प्रकारची सूचना मिळतांच रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांनी आपापली घरें सोडून प्रॉटेस्टंटपंथीय लोकांच्या घरांमध्यें प्रवेश करून अंगावर शहारे आणणारी कृत्यें केलीं ! त्या दिवशीं एकट्या पॅरिस शहरीं २००० ह्युगेनाट पक्षांतील लोकांचे खून पाडण्यांत येऊन, पॅरिस- खेरीज इतर शहरांमध्यें रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांच्या त्वेषाला हजारों प्रॉटेस्टंटपंथीय लोक बळी पडले होते. या भयंकर कत्तलीमध्ये ह्युगेनाट सेंट बार्थोलोम्यूच्या दिवशीं झालेली कत्तल - २४ ऑगस्ट १५७२. पक्षाचा पुढारी कॉलिन्यी याचा वध करण्यांत आला असून, नॅव्हेरीचा हेन्री याच्यावरही तोंच प्रसंग आला असता, परंतु त्याने यावेळीं आपण प्रॉटेस्टं- टपंथाचा त्याग केला असल्याचें सांगितल्यामुळेंच त्याची या वेळी सुटका झाली ! फ्रान्समध्यें सेंट बार्थोलोम्यूच्या दिवशी प्रॉटेस्टंट पंथीय लोकांची झालेल्या कत्तलीची वार्ता एकतांच, पोप, स्पेनचा राजा २ रा फिलीप व कॅथलीक पंथाचे अनुयायी यांस अत्यानंद झाला ! २४ ऑगस्ट रोजी झालेल्या कत्तलीची वार्ता ऐकतांच प्रॉटेस्टंट- पंथीय लोकांस त्वेष आला, व त्यांनीं मध्यंतरी थांबलेलें युद्ध पुनः सुरू केलें. १५७४ मध्यें ९ वा चार्लस मरण पावल्यामुळे त्याचा भाऊ तिसरा हेन्री गादीवर आला ( १५७४ ते १५८९ ). तिसरा हेन्री गादीवर येऊन थोडे दिवस लोटले नाहींत तोंच हेन्रीचा धाकटा भाऊ मरण पावल्यामुळे प्रॉटेस्टंट व रोमन कॅथलीक यांच्या कलहास निराळेंच स्वरूप प्राप्त झालें. तिसऱ्या हेन्रीस कोणी पुत्रसंतान नसून प्रस्तुतच्या राजघराण्यांतही कोणी वारस नसल्यानें राजघराण्याशी संलग्न असलेल्या बोरबोन घराण्यांतच फ्रान्सचें राज्यपद जाण्याचा संभव होता ! ह्युगेनाट पंथाचा पुढारी नॅव्हेरीचा हेन्री हाच बोरबोन घराण्यांतील प्रमुख पुरुष असल्यानें, त्यास फ्रान्सचें राज्यपद मिळणार हें पाहून रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांस आपले सर्व बेत पुनः ढासळ नॅव्हेरीच्या हेन्रीस फ्रान्सची गादी मिळण्याचा संभव.