पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरण जाऊन, फ्रान्सचा प्रतिस्पर्धी स्पेन या राष्ट्राचाच अप्रत्यक्ष रीतीनें फायदा होत आहे हें प्रॉटेस्टंट पंथाचा पुढारी कालिन्यी याच्या लक्षांत आलें. फ्रान्सचा राजा ९ वा चार्लस यालाही कालिन्यीचें म्हणणें पटून दोन्ही पक्षांमध्ये एकी घडवून आणण्यासाठी, नॅव्हरीचा हेन्री ( अॅन्थनीचा पुत्र ) यास आपली बहीण मार्गारेट हिला देण्याचें ठरविलें; व या विवाहा- साठीं १८ आगस्ट १५७२ रोजी ह्युगेनाट पंथांतील लोक पॅरीस शहरीं लोटूं लागले. परंतु या विवाहाची गोष्ट ऐकून कॅथलीक पंथाच्या लोकांचें पित्त खवळून गेलें ! आपल्या राजानें, आपली बहीण मार्गारेट हिचा प्रॉटेस्टंट- पंथीय हेन्री याच्याशीं विवाह घडवून आणणें गाईझच्या पक्षाकडील- लोकांस मुळींच आवडलें नाहीं. यावेळीं कॅथराईन डी मेडीसी हिचें कॅथराईन व गाईस यांचा कट. चार्लसवर असलेले वजन कमी झालें होतें. व आतां तर या विवाहानंतर राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे प्रॉटेस्टंट पंथाचे पुढारी नॅव्हेरीचा हेन्री व कालिन्यी यांच्या हातांत जाऊन आपलें चार्लसवर असलेलें थोडेंफार वजनही नष्ट होणार हें पाहून तिनें गाईझ पक्षाकडील रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांस जाऊन मिळण्याचें ठरविलें. यानंतर कालिन्यीचा वध करण्यासाठीं त्यांनीं आपसांत एक कट रचला. २२ ऑगस्ट रोजीं या कटाच्या प्रेरणेनेंच कालिन्यी हा आपल्या घरांत शिरत असतां त्याजवर गोळी झाडण्यांत आली; परंतु सुदैवानें ती गोळी त्याच्या छातीत न शिरतां त्याच्या हातांवर बसल्यामुळें त्याचे त्यावेळीं प्राण वाचले. अशा प्रकारें कालिन्यीचा प्राण घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मारे- कन्याचा व त्याला चिथावून देणाऱ्या मंडळींचा शोध लावून त्यांस कडक शिक्षा देण्याचें चार्लसनें ठरविलें. चार्लसचा हा निश्चय हातांच तिचे साथीदार यांचें धाबे दणाणलें. कटवाल्यांचा शोध लागून आप- णास पकडण्यांत येईल अशी सर्वांस भीति वाटूं लागली. तेव्हां आपणावर येणारे संकट टाळण्यासाठीं एक भयंकर कट रचण्याचा त्यांनी विचार केला. २४ ऑगस्ट रोजी सेंट बार्थोलोम्यच्या दिवशीं पहांटे पॅरिस