पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें . ] फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. ९३ · कडून कोणतीच शिक्षा करण्यांत न आल्यामुळें आतां युद्ध केल्याखेरीज गत्यंतर नाहीं असें वाटून बोरबोन घराण्यांतील काँडे व ह्युगेनाटपंथांतील प्रमुख सरदार कॉलिनयी या दोघांनीं गाईझवर सूड उगविण्याचा निश्चय केला. अशा रीतीनें फ्रान्समध्यें धार्मिक व राजकीय बाबींचा निकाल लावण्यासाठीं युद्धे उपस्थित होऊन तें १५९८ मध्ये नाँटचा जाहीरनामा जाहीर होईपर्यंत सुरू होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं ! तेव्हां १५६२ पासून १५९८ पर्यंत झालेल्या सर्व युद्धप्रसंगांस आपण एकाच मोठ्या युद्धामध्यें गोंवलें पाहिजे; कारण जरी मध्यंतरीं तह होऊन युद्ध बंद झाल्यासारखें दिखें, तरी या तहाच्या काळांत प्रत्येक पक्षाकडून पुढील युद्धासाठींच तयारी करण्यांत येई ! १५६२ मध्ये व्हासी येथें घडलेल्या प्रसंगानें चिडून जाऊन ह्यगेनाट पक्षानें युद्धाची तयारी केली. या वेळीं अॅन्थनी हा ह्यगेनाट पक्ष सोडून गेल्यामुळे त्यास ठार करण्यांत आलें व लागलीच एका वर्षांनें गाईझच्या सरदाराचा वध करण्यांत आला. त्यानंतर १५६९ मध्ये ह्यूगेनाट पक्षाचा पुढारी कॉन्डे हा एका चकमकींत मारला गेला. अशारीतीनें दोन्ही पक्षांतील पुढारी मंडळी मारली गेल्यामुळे १५७० मध्ये सेंट जर्मेनचा तह करण्यांत आला. अशा रीतीनें १५६२ पासून १५७० पर्यंत या युद्धाचा पूर्व भाग चालला असतांना दोन्ही पक्षांमध्यें कांहीं तडजोड ठरून युद्धाचें समूळ कारणच नष्ट करण्याचा कांहीं मंडळींनीं प्रयत्न चालविला होता. १५७० च्या सुमारास दोन्ही पक्षांतील कांहीं प्रमुख मंडळी मारली गेल्यावर जो सेंट जर्मेनचा तह ठरविण्यांत ( १५७०) आला, तो तह कायमचाच समजण्यांत यावा अशी दोन्ही पक्षांतील प्रमुख मंडळींनीं खटपट चाल- विली होती. या वेळीं प्रॉटेस्टंट पंथाचा पुढारी कॉलिनयी यानें दोन्ही तडजोड करण्या- ची खटपट. पंथांमध्यें कायमचा तह घडवून आणण्यासाठीं कांहींतरी व्यवस्था मुकर व्हावी म्हणून ९ व्या चार्लसचे मन वळविलें होतें. इतके दिवस फ्रान्स- मध्यें चाललेल्या अंतःस्थ कलहामुळें, फ्रान्सची शक्ति उत्तरोत्तर दुर्बल होत