पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण कॅथराईनच्या कृत्यानें आपली महत्त्वाकांक्षा सफल होण्याची सर्वच आशा नष्ट झाली असें दोन्ही पक्षांस वाटूं लागलें. परंतु कॅथराईन ही कांहीं कभी धोरणी स्त्री नव्हती. तिनें फ्रान्समधील सर्व परिस्थिति पाहून आपलें राजकीय धोरण ठरविलें. आपली सत्ता ज्यांना पाहावत नाहीं अशा दोन्ही पक्षांमध्यें धर्मविषयक बाबतींत तीव्र मतभेद असल्या- मुळें, त्यांना एकमेकांविरुद्ध उयुक्त करून आपली सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करावयाचा असा तिनें विचार केला; व या हेतूनें दोन्ही पक्षांतील प्रमुख मंडळीस आपल्या प्रधानमंडळांत स्थान देऊन, प्रॉटेस्टंटपंथीय लोकां- वर होणारा धार्मिक छळ कमी केला, इतकेंच नव्हे तर सर्वांना धार्मिक बाबतींत आपल्या इच्छेप्रमाणें वागण्यास बऱ्याच सवलती दिल्या. परंतु कॅथराईनचें धोरण. तिच्या या कृत्यानें दोन्ही पक्षांतील लोकांस समा- धान न वाटतां दोन्हीही पक्ष असंतुष्टच राहिले.. प्रॉटेस्टंट पंथीय लोकांस देण्यांत आलेल्या धार्मिक सवलती रोमन कॅथ- लीक पंथाच्या लोकांस आवडल्या नाहींत; तद्वतच आपणास देण्यांत आलेल्या सवलती फारच तुटपुंज्या आहेत असें प्रॉटेस्टंट पंथीय लोकांस वाटत असल्यामुळे तेही असंतुष्टच राहिले. अशा प्रकारें फ्रान्समधील दोन्ही. पक्षांमध्यें वैमनस्य असल्यामुळें पुष्कळ वेळां थोडें कारण घडतांच या दोन्ही पक्षांच्या अनुयायांमध्यें बखेडा उत्पन्न होऊन रक्तपातापर्यंत मजल जाई !! १५६२ मध्ये अशाच प्रकारचा एक प्रसंग व्हासी येथें घडून आल्यावर दोन्ही पक्षांमध्यें मोठें युद्ध उपस्थित झालें. गाईझ घराण्यांतील सरदार आपल्या सशस्त्र अनुयायांसह एके ठिकाणी जात असतां त्यांचा व्हासी या गांवानजीन मुक्काम पडला. त्या गांवीं फ्रान्समधील गेनाट पक्षांतील कांही लोक प्रार्थना करण्यासाठी जमले असतां दोन्ही पक्षांमध्ये व्हासी येथील चकमक. बोलाचाली होऊन हैं प्रकरण हातघाईवर आलें, व ह्युगेनाट पंथाचीं सुमारें ५० माणसें ठार केल्यावर गाईझ घराण्यांतील सरदारानें त्या गांवां- तून पाय काढला. परंतु गाईझच्या या कृत्याबद्दल त्यास राज्यकर्त्या -