पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें . ] फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. ९१ चालविला. फ्रान्समधील प्रॉटेस्टंट ( ज्यांना ह्यूगेनाटस् असें म्हणत ) पंथाचे लोक यांना बोरबोन घराण्यांतील पुरुषांनीं आपल्या कटांत सामील करून घेऊन स्वतः प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला. अशा रीतीनें इतः पर फ्रान्समधील ह्युगेनाट लोक केवळ धार्मिक बाबींतच लक्ष घालीत नसून राजकीय बाबींतही लक्ष घालूं लागले. तेव्हां फ्रान्समधील राजसत्तेच्या कमकुवतपणामुळे राज्यकारभारा- चीं सर्व सूत्रे आपल्या हातांत घेण्यासाठी निरनिराळे कट अस्तित्वांत फ्रान्समधील चमत्कारिक परिस्थिति. येऊं लागले. फ्रान्समध्ये अशा प्रकारची चमत्कारिक परिस्थिति असतांना १५६० मध्ये २ या फॅन्सिस - च्या मृत्यूमुळें तर ही चमत्कारिक परिस्थिति फारच बिकट झाली ! २ या फॅन्सिसच्या मृत्यूमुळे त्याची पत्नी स्कॉटलंडची राणी मेरी हिला देखील आतां आपला अधिकार संपुष्टांत आला असें वाटून फ्रान्समधून पाय काढावा लागला. मेरी स्कॉट- लंडमध्ये गेल्यावर केवळ तिच्यामुळेच प्रसिद्धीस आलेल्या गाईझ घराण्यां- तील पुरुषांसही आपला अधिकार संपुष्टांत आला असें वाटलें व तें थोड- · क्याच दिवसांत प्रत्ययासही आलें. २ ऱ्या फ्रॅन्सिसच्या मृत्यूनंतर त्याचा दहा वर्षे वयाचा नेभळा भाऊ ९ वा चार्लस फ्रान्सच्या तक्तावर बसला; परंतु राज्यकारभार चालविण्यास हा अगदींच असमर्थ असल्यामुळे, तो वयांत येईपर्यंत त्याची आई कॅथराईन डी मेडीसी हिला राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातांत घेतां येऊन आपली महत्त्वाकांक्षा सफल करतां आली ! परंतु तिच्या या सर्व कृत्यांकडे रोमन कॅथलीक पंथीय गाईझ घराण्यांतील पुरुष, त्याचप्रमाणें प्रॉटेस्टंट पंथीय लोकांची मदत घेऊन कट स्थापन करणारे वोरबोन घराण्यांतील पुरुषही डोळ्यांत तेल घालून पहात होते ! कॅथराईन डी मेडीसी हिच्या हातांत सर्व सूत्रे जातात.