पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. खन १४९४ मध्ये फ्रान्सचा राजा ८ वा चार्लस यानें इटलीवर स्वारी "केली, त्या दिवसापासून इटालियन द्वीपकल्पाकडे फ्रेंच राजांचें लक्ष लागलेलें होतें. इटलीमध्ये जाऊन आपला पराक्रम गाजवावा अशी प्रत्यके राजाची महत्त्वाकांक्षा असे. १५९५ मध्ये १ ला फॅन्सिस, फ्रान्सच्या गादीवर येतांच इटलीमध्यें जाऊन आपला पराक्रम गाजवावा व त्या पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या भूमींत आपली वैभवपताका रोंवावी .अशी त्यास इच्छा उत्पन्न झाली; व लागलीच त्यानें १५१५ मध्ये मॅरीग्नेनो येथें मीलनच्या राजाच्या हाताखालील स्विस फौजेचा पराभव करून मीलनचे संस्थान आपल्या ताब्यांत घेतलें. परंतु फ्रान्सचा हा उत्कर्ष जर्मनीचा बादशहा व स्पेनचा राजा ५ वा चार्लस यांस कांहीं पाहवला नाहीं; तर फ्रॅन्सिसची पूर्णपणे खोड मोडून इटलीमधील फ्रान्सचें वर्चस्व नाहींसें करण्याचा त्यानें निश्चय केला. तेव्हां अशारितीने फॅन्सिस व चार्लस यांच्यामध्यें इटलीमधील वर्चस्वासंबंधानें स्पर्धा उत्पन्न होऊन युद्ध उपस्थित झालें, व १५२५ मध्यें पेव्हिया येथील लढाईत फॅन्सिसचा पूर्ण पराभव करून चार्लसनें १५२७ मध्ये फॅन्सिसला मदत करणारें रोम शहर उध्वस्त करून टाकिलें. फ्रन्सिसच्या अमदानीस सुरवात झाल्यापासूनच धर्मसुधारणेची चळ- वळ फ्रान्समध्यें सुरू झाली होती; परंतु कलाकौशल्य व ऐहिक सुखसाधनां- च्या गोष्टी यांची उन्नति करण्याकडे त्याचा कल असल्यामुळें धर्मसुधा- रणेच्या चळवळीस त्याच्याकडून मुळींच पाठबळ मिळालें नाहीं. फ्रान्समध्यें लेफेचे नांवाच्या एका गृहस्थानें ही चळवळ पहिल्यानें सुरू करून आप- फ्रान्समधील धर्म- सुधारणेची चळवळ. णास इतरांचें पाठबळ मिळविण्याचा प्रयत्न केला.