पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें . ] फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. ८९ फ्रान्समध्यें ही चळवळ सुरू होतांच जुन्या मताच्या धर्मवेडया लोकांकडून व पॅरिसमधील रोमन कॅथलीक पंथाचा प्रसार करणाऱ्या विद्यापीठाकडून या चळवळीस जोराचा विरोध करण्यांत आला. त्यावेळीं फ्रॅन्सिसचें या धार्मिक चळवळीकडे असलेलें धोरण अगदीं तटस्थ- वृत्तीचें असल्यामुळें कॅथलीकपंथीय लोकांकडून करण्यांत आलेल्या विरोधाचा कांहीं विशेष परिणाम झाला नसता; परंतु पेव्हिया येथील लढाईत (१५२५) फॅन्सिसचा चार्लसकडून पराभव झाल्यामुळें, त्यास पोपच्या मदतीची फारच फॅन्सीस धर्मचळवळी- कडे लक्ष घालतो. अवश्यकता भासूंं लागली; व म्हणून पोपला खुष करण्यासाठीं फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ हाणून पाडण्याकडे तो तो लक्ष घालूं लागला. अशा रीतीनें फ्रान्समधील धर्मसुधारणेस राज्यकर्त्यां- कडून विरोध करण्यांत आला. फ्रॅन्सिसनंतर फ्रान्सच्या गादीवर येणारा त्याचा मुलगा दुसरा हेन्री (१५४७ ते ५९) हा तर रोमन कॅथलीक पंथाचा कट्टा अभिमानी होता, व त्यानें आपल्या राज्यारोहणाच्या दिवशींच ' आपण रोमन कॅथलीक पंथाच्या विरुद्ध असलेल्या सर्व लोकांचा नायनाट करूं' असें जाहीर केलें ! परंतु या वेळीं धर्मसुधारणेचें बीज फ्रान्समध्ये नीट रुजलें असल्यामुळे त्यास आपल्या इच्छेप्रमाणें कांहींच करतां आलें नाहीं. यावेळीं राज्यकर्त्यां- कडून वेळोवेळीं जाहीरनामे काढण्यांत येऊन धर्मासंबंधीं जरी पुष्कळांना फांशीं देण्यांत येई तरी फ्रान्समधील धर्मसुधारणा नष्ट न होतां ती अधिकच टिकाव धरून राहिली. दुसऱ्या हेन्रीच्या मृत्यूनंतर (१५५९ ) त्याचा सोळा वर्षे वयाचा मुलगा २ रा फॅन्सिस गादीवर आला त्यावेळीं राज्यांत सर्वत्र गोंधळ माजून राहिला. २ रा फॅन्सीस हा अगदींच नेभळा व अशक्त असून राज्यकार- भाराचें जोखमीचें काम अंगावर घेण्यास अगदीच असमर्थ होता, व त्याची पत्नी स्कॉटलंडची राणी मेरी ही देखील अल्पवयी असल्यामुळे ६