पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वॅ. ] डच लोकांचा स्वराज्यप्राप्तीचा प्रयत्न. ८७ कौशल्य वगैरे निरनिराळ्या बाबींत देखील या राष्ट्रानें सतराव्या शतका- मध्यें सर्व युरोपभर आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें होतें ! 'अंतर्राष्ट्रीय कायदा' या विषयांवरील आय लेखक ह्युगो ग्रोटीअस, स्पॅनोझा नांवाचा तत्त्ववेत्ता वगैरे प्रसिद्ध पुरुष या राष्ट्रांत निर्माण होऊन त्यांच्या प्रयत्नानें युरोपियन बाङ्मयांत भर पडली. त्याचप्रमाणे, पूर्वेकडील प्रदेशांत या राष्ट्रानें आपल्या वसाहती स्थापन करून आपला व्यापार वाढविला होता, तो इतका कीं सतराव्या शतकामध्यें व्यापार, पैशाची देवघेव वगैरे बाबतींत अमस्टर्डाम हें शहर सर्व युरोपचें केंद्रस्थानच होऊन बसलें होतें.