पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ हालंडच्या स्वातं- युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण 'प्रजासत्ताक राष्ट्राशीं तह केल्यावांचून गत्यंतरच नव्हतें ( १६०९ ). १६२९ मध्यें ज्यावेळीं या तहाची मुदत संपली त्यावेळीं सर्व युरोपभर धर्मयुद्ध सुरू होते व या सर्वत्र माजलेल्या गोंधळाचा "फायदा घेऊन पुनरपि हॉलंडदेश आपल्या ताब्यांत आणण्याचा स्पेननें प्रयत्न केला; परंतु या खेपेसही स्पेनच्या प्रयत्नास यश न येतां तो निष्फळ ठरला; व १६४८ मध्यें युरोपमध्यें गेलीं तीस वर्षे सुरू अस- लेलें धर्मयुद्ध संपून जेव्हां वेस्टफालिया येथें तह करण्यांत आला, त्यावेळीं स्पेननें हॉलंडचें स्वातंत्र्य उघड रीतीनें कबूल केलें ! डच लोकांच्या प्रजासत्ताक राष्ट्राचा पाया युट्रेक्टच्या तहाच्या वेळींच (१५७९) बसविला होता असें म्हणण्यास हरकत नाहीं. यावेळी त्या राष्ट्राच्या अंतस्थ राज्यव्यवस्थेसंबंधीं सर्व अधिकार ' कॉन्सल ऑफ स्टेट ' व “ त्र्यास स्पेनची कबुली. , स्टेटस् जनरल ' या दोन सभांस देण्यांत आले होते. परंतु हॉलंडमधील संयुक्त झालेल्या सात प्रांतांतील लोकांस या दोन सभांमध्यें केंद्रीभूत झालेली राज्यव्यवस्था आवडली नाहीं. प्रांतिक सरकारच्या ताब्यांतही कांहीं अधिकार असणें इष्ट आहे असें तेथील लोकांस वाटत होतें. व याखेरीज त्यावेळच्या एकंदर व्यवस्थेमुळे केवळ वरिष्ठ वर्गाच्या लोकांच्या हातांतच सर्व प्रकारचे राजकीय हक्क असल्यामुळे खालच्या दर्जाच्या लोकांचे अर्थातच राजकीय हक्क संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. डच लोकांना स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची औद्योगिक व आध्यात्मिक हॉलंडचा उत्कर्ष. बाबतींत विलक्षण उन्नति झाली. सतराव्या शतका- मध्यें या चिमुकल्या राष्ट्रानें केवळ राजकीय बाबतींतच आपलें महत्त्व स्थापन केलें होतें असें नव्हे तर औद्योगिक व्यापारविषयक बाबींत अग्रेसरत्वाचा मान संपादन केला असून, सर्व युरोपियन राष्ट्रांच्या बाजारपेठा आपल्या कबजांत आणल्या होत्या ! औद्योगिक बाबीप्रमाणें शास्त्रीय, तात्त्विक, वाङ्मयविषयक, वैद्यक, कला-