पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वे. ] डच लोकांचा स्वराज्यप्राप्तीचा प्रयत्न. ८५ व इलिझाबेद राज्ञीस वाटून अर्ल ऑफ लीस्टर या सरदाराच्या हाता- खालीं एक सैन्य हॉलंडमध्यें पाठविण्यांत आलें. ३ रा फिलीप इंग्लंडवर उपसतो. अर्ल ऑफ लीस्टर हा अगदींच नालायक गृहस्थ असल्यामुळें त्याच्या हातून कांहींच कामगिरी न होऊन जरी त्यास परत फिरावें लागलें तरी यावेळीं डच लोकांना उघड रीतीने मदत करण्याचें इंग्लंडने धारिष्ट. दाखविलें असल्यामुळेंच डच लोकांचा त्यावेळीं टिकाव लागला असें म्हण- ण्यास हरकत नाहीं; कारण आतां यावेळी इंग्लंडने डच लोकांस उघड: रीतीने मदत केलेली पाहून २ रा फिलीप अधिकच खवळला व त्यानें डचः लोकांचा पुरता पराभव करण्याचें टाकून इंग्लंडवर शस्त्र उपसलें. इंग्लंडचा फडशा पाडण्यासाठीं त्यानें एक बलाढ्य आरमार तयार करवून तें १५८८ मध्यें रवाना केलें; २ या फिलीपनें इंग्लंडवर पाठविलेल्या आरमाराची कशी दुर्दशा उडाली हैं आपण गेल्या प्रकरणांत पाहिलेंच आहे. परंतु या पराभवानंतर स्वस्थ न बसतां फिलीपनें फ्रान्सवर शस्त्र उपसलें. फ्रान्सचा राजा हेन्री ऑफ नॅव्हेरी ( १५८९ ते १५९८ ) याच्याबरोबर युद्ध करतांना स्पेनला आपली सर्व शक्ति खर्च करावी लागल्या- मुळें हॉलंडसारख्या चिमुकल्या राष्ट्राचा पराभव करण्याची शक्तिच स्पेनमध्यें उरली नाहीं. अशारीतीनें इंग्लंड व फ्रान्स या दोन बलाढ्य राष्ट्रांशीं झगडावें लागल्यामुळे जरी स्पेनची शक्ति कमी झाली होती, तरी देखील फिलीपनें डच लोकांचें बंड मोडून टाकण्याची आशा कांहीं सोडली नाहीं. फिलीपच्या मृत्यूनंतर ड्यूक ऑफ पार्मा या सरदारानें डच राष्ट्राशीं युद्ध तसेंच पुढे चालविलें होतें. १५९८ मध्यें ड्यूक ऑफ पार्माच्यानंतर तिसऱ्या फिलीपनें स्वतः डच राष्ट्राशीं टक्कर देण्याचा प्रयत्न केला; परंतु उच लोकांचा तरुण सेनापति मॅरीस याने हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरविले. अशारीतीनें आपल्या ताब्यांतील प्रांतांनी केलेल्या बंडाचा प्रतिकार करण्यासाठीं स्पेननें केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर स्पेनला डच