पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण - नाहींसें करण्यासाठी 'वुइत्यमला कोणीं पकडून आपल्या स्वाधीन केल्यास किंवा त्याचें शीर आणून दाखविल्यास मोठें बक्षीस देण्यांत येईल' असें "जाहीर करण्यांत आलें. त्यावेळीं धर्मवेडे व माथेफिरू लोक पुष्कळ असल्या - मुळे इल्यमचा प्राण घेण्याचे प्रयत्न पुष्कळ होऊं लागून, सरतेशेवटीं बालथासर गेरार्ड ' नांवाच्या एका रोमन कॅथलीक पंथाच्या गृहस्थानें १५८४ च्या जुलै महिन्यांत, एके दिवशीं वुइल्यम जिन्यावरून खालीं येत असतां, त्याच्यावर गोळी झाडून त्याचा प्राण घेतला! वुइल्यमचा वध झाल्या- 6 विइल्यमचा खून. १५८४ झीलंड हे वर तर डच लोकांची फारच निराशा झाली ! या वेळीं ड्यूक ऑफ पार्मा डच लोकांवर एकसारखे जय मिळवीत असून चंडाचें क्षेत्र एकसारखें आकुंचित करीत होता ! आतां हॉलंड व दोन प्रांत कायते डच लोकांच्या हातीं राहिले होते, तरी डच लोकांनीं धीर न सोडतां, मॅरीस नांवाच्या वुइल्यमच्या सतरा वर्षे चयाच्या मुलाला आपल्यावरील मुख्य गव्हर्नर नेमिलें व त्यास लष्करी सेनापति करून आपला प्रयत्न तसाच पुढे चालविण्याचें ठरविलें. यावेळीं 'जॉन ऑफ बार्नेवेल्ड' नांवाचा एक पुरुष उदयास येऊन त्यानें मॅरासला योग्य सल्ला देण्याच्या कामी पुष्कळच मदत केली. यावेळी ड्यूक ऑफ पार्मा यानें एकसारखे जय मिळवून डच- लोकांचा पराभव करण्याची पराकाष्ठा चालविली असल्यानें डच लोकांना इंग्लंडकडून मदत. बाहेरून मदत मिळाली नसती तर त्यांना स्पॅनिश सैन्याविरुद्ध फार वेळ टिकाव धरतां आला नसतां हैं उघड होतें. आपल्या प्रयत्नास इंग्लंड व फ्रान्स यां- सारख्या परकीय राष्ट्रांनी मदत करावी अशा प्रकारची खटपट वुइल्यमच्या हयातीतच करण्यांत आली होती; परंतु त्यावेळीं या राष्ट्रांकडून डच लोकांना पैशाच्या मदतीखेरीज दुसरी मदत मिळाली नाहीं. पण आतां प्रॉटेस्टंट पंथीय डच लोकांस मदत करावी असें इंग्लंडमधील जनतेस