पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वॅ. ] डच लोकांचा स्वराज्यप्राप्तीचा प्रयत्न. ८३ कृत्यानें खवळून जाऊन संयुक्त नेदर्लंडने आपल्या जुलमी राज्यकर्त्या- विरुद्ध संघटित प्रयत्न करण्यासाठी 'घंट' येथें वाटाघाट केली (१५७६). . अशा प्रकारें संघटित प्रयत्न करण्यासाठी जरी खटपट करण्यांत आली, तरी डॉन जॉन ऑफ आस्ट्रिया ( १५७६ ते १५७८ ) आणि पारमाचा ड्यूक या दोन स्पॅनिश गव्हर्नरांनी नेदर्लंडमधील जनतेमध्यें अंतःस्थ कलह उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेथील जनतेस संघ- टित प्रयत्न करतां आला नाहीं, तर प्रॉटेस्टंट पंथीय हॉलंड व रोमन कॅथ- लीकपंथीय बेलजम असे नेदर्लंडचे दोन विभाग धार्मिक मतभिन्नतेमुळें अस्तित्वांत आणले गेले. पारमाचा ड्यूक अलेक्झांडर हा गव्हर्नर असतांना त्यास आपल्या मुत्सद्देगिरीनें व धोरणानें दक्षिण नेदर्लंड हा प्रांत बंडापासून अलिप्त ठेवतां आला. तेथील रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांना राजकीय हक्क देण्याचें आमिष दाखविल्यामुळे घेंट येथें झालेल्या व्यवस्थेप्रमाणें या लोकांची स्वराज्यप्राप्तीच्या प्रयत्नास सहानभूति न मिळून, ते इतर प्रॉटे- स्टंट पंथीय लोकांपासून अलिप्तच राहिले! अशाप्रकारें वुइल्यमची निराशा होऊन संयुक्त नेदर्लंडतर्फे बंड करण्याची आशाच त्यास सोडून द्यावी लागते कीं काय असें वाटू लागलें, परंतु वुइल्यमनें आपला यत्किंचितही खचू न देतां लहान प्रमाणावरच आपल्या प्रयत्नाची उभारणी केली. इतके दिवस उत्तर नेदर्लंडमधील प्रत्येक प्रांतांकडून संघटित प्रयत्न होत नसल्यामुळे त्यांच्या प्रयत्नास यश येण्याचा संभव कमी होता; परंतु आतां संघटित प्रयत्न करण्यासाठी उत्तरे- कडील सर्व प्रांतांनीं युट्रेक्ट येथें तह केला, व या तहाचीच पुढें उत्क्रान्ति होऊन डच लोकांचें एक प्रजासत्ताक राष्ट्र स्थापण्यांत आलें. संघटित प्रयत्न कर- याचा युट्रेक्ट येथे झा- लेला तह. १५७९ नेदर्लंडमधील चळवळीचा प्रवर्तक वुइल्यमच आहे अशी २ फिलीपची खात्री असल्यामुळे, त्याला येन केन प्रकारेण या जगांतून