पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरणा तेव्हां नाइलाजास्तव तेथील बंडाचा मोड करण्यासाठीं त्यास सैन्याचा लॅडनचा वेढा - १५७४. उपयोग करावा लागला. त्याच्या अमदानींत लॅडेन- चा वेढा फारच महत्त्वाचा आहे. जेव्हां धान्य- सामुग्रीच्या तुटवट्यामुळें हें ठाणें हातचें जातें असें डच लोकांना वाटलें तेव्हां त्यांनीं, समुद्राच्या लाटेस थोपवून धरणारे नेदर्लंडमधील बंधारे फोडून टाकले व सर्व प्रदेश जलमय करून टाकला. या एकाचं उदाहरणानें डच लोकांच्या अंगची चिकाटी व स्वराज्यप्राप्तीसाठीं वाटेल ते प्रयत्न करण्याचा दृढनिश्चय स्पष्टपणें दिसून येतात ! नेदर्लंडमधील दोन्ही पंथांच्या लोकांकडून संघटित प्रयत्न होतो. १५७६ मध्यें तेथील गव्हर्नराच्या मृत्यूनंतर या बंडाच फैलाव अधिक विस्तृत रीतीनें होऊं लागला. इतके दिवस नेदर्लंडच्या उत्तरभागांत असलेल्या प्रॉटेस्टंटपंथीय जनतेमध्येंच या बंडाचा फैलाव झालेला होता, परंतु आतां दक्षिणेकडील शहरें देखील या स्वराज्यप्राप्तीच्या प्रयत्नांत सामील होऊं लागलीं. स्पेनसारख्या पर-- कीय राजसत्तेचें जुलमी जूं आपल्या मानेवरून झुगारून द्यावें असें प्रत्येकास वाटूं लागलें. दक्षिणे-- कडील जनतेचा कल रोमन कॅथलीक पंथाकडेच असल्यामुळें, आज इतके दिवस उत्तरेकडील प्रॉटेस्टंटपंथीय लोकांनीं उभा- रलेल्या बंडास दक्षिणेकडील जनतेची सहानुभूति मिळाली नव्हती. परंतु. रेक्केसेन्स या गव्हर्नराचा मृत्यु होऊन फार दिवस झाले नाहींत त नेदर्लंडमधील केल्टस् व ट्यूटन्स जातीचे लोक त्याचप्रमाणें दोन्ही पंथाचे लोक, थोडक्यांत संयुक्त नेदर्लंड या स्वराज्य-- प्राप्तीच्या प्रयत्नांत सामील झाला. यावेळीं स्पॅनिश सैन्याच्या अनन्वित कृत्यानें, नेदर्लंडमधील लोकांस स्पॅनिश सैन्याबद्दल वाटत अस-:- लेल्या तिटकाऱ्यांत अधिकच भर पडली. स्पॅनिश सैन्याच्या अनन्वितः