पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें . ] डच लोकांचा स्वराज्यप्राप्तीचा प्रयत्न. ८१ साहाय्य मिळेल अशी वुइल्यमनें व्यर्थ आशा केली होती ! परंतु आतां . या लोकांनी बंड उभारले असून त्या बंडाचें नेतृत्व पतकरावें अशी .त्यांनीं वुइल्यमला विनंति केली. इकडे हैं नवीन उपस्थित झालेलें बंड मोडून टाकण्यास कोणते उपाय योजावे याचा आल्व्हा विचार करूं लागला. स्पॅनिश सैन्याच्या -मदतीनें त्यास डच लोकांवर मॅचलिन, व हॅर्लेम वगैरे ठिकाणीं जय मिळून नेहमीप्रमाणे त्याच्याकडून अनन्वित कृत्येंही करण्यांत आली; परंतु यावेळीं डच लोकांनीं आल्व्हाच्या जुलमी कृत्यांस यत्किंचितही न घाबरतां आपला प्रयत्न तसाच पुढें चालविला. नेदर्लंडमध्यें नीट व्यवस्था ठेवण्यास आल्व्हा हा अगदींच असमर्थ होता हें आतां बहुतेक सिद्ध झालें होतें ! सहा वर्षेपर्यंत ( १५६७ ते १५७३ ) जुलमी धर्मकोर्ट व बंडखोर लोकांच्या चौकशीसाठीं निर्माण केलेलें मंडळ यांच्या मदतीनें जरी त्या प्रांतामध्ये स्वस्थता राखण्याचा • त्यानें प्रयत्न केला होता, तरी तेथील घडी त्यास नीट रीतीनें बसवितां आली नाहीं इतकेंच नव्हे, तर तेथें आतां दुसरेंच एक बंड उपस्थित . झाल्यामुळे, आपणास येथें नीट व्यवस्था लावतां येणार नाहीं असें वाटून आपणास परत बोलाविण्याविषयीं त्यानें फिलीपला विनंति · केली ( १५७३ ). आल्व्हाच्या नंतर नेदर्लंडप्रांतावरील सुभेदारीच्या जागेवर 'रेक्के- • सेन्स ' नांवाच्या सरदाराची नेमणूक करण्यांत आली ( १५७३ ते १५७६ ). हा नवीन गव्हर्नर उदार व धोरणी असल्यामुळें आल्व्हाच्या • अमदानींत तेथें बिकट परिस्थिति झाली नसती तर त्यास येथें पूर्णपणें स्वस्थता राखतां येणें शक्य झालें असतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेथें आल्यावर त्यानें बंडखोर लोकांच्या चौकशीसाठी स्थापलेलें मंडळ · नाहींसें केलें तरी देखील लोकांस त्याच्या हेतूबद्दल संशयच वाटत होता !