पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण प्राप्त करून देण्यामध्यें आपलें सर्व आयुष्य खर्च केलें असल्यामुळें डच . लोक त्याचे गोडवे गातात. १५६८ मध्यें वुइल्यमनें आपणास शक्य वुइल्यमचा पहिला प्रयत्न निष्फळ ठरतो. होती तेवढी पैशाची कुमक घेऊन नेदर्लंडवर हल्ला करण्यासाठी सैन्य जमा केलें. आपला हा प्रयत्न हातांच नेदर्लंडमधील जनता आल्व्हाच्या विरुद्ध उठून आपणास साहाय्य करील अशी त्याची कल्पना होती. परंतु आल्व्होंने नुकत्याच केलेल्या कडक कृत्यांची लोकांस भीति वाटत असल्यामुळें त्यांच्याकडून वुइल्यमला कांहींच मदत न मिळतां आल्व्हाच्या कवाईत शिकवून तयार ठेवलेल्या सैन्यापुढें वुइ- ल्यमच्या सैन्याचा टिकाव न लागून त्यास पळ काढावा लागला. परंतु एवढ्यानेंच आल्व्हा थांबला नाहीं, तर आतां नेदर्लंड प्रांत आपल्या पूर्णपणे कबज्यांत आला आहे असें वाटून, त्यास त्यावेळीं पैशाची फारच नड असल्यामुळे त्यानें १५७१ सालीं तेथील लोकांच्या व्यापारावर शेंकडा १० टक्के कर बसविण्याचें ठरविलें. या जुलमी करामुळें प्रत्येक देवघेवीवर शेंकडा १० टक्के सरकारांत भरावें लागत असल्यामुळें, लोकमत बरेंच क्षुब्ध झालें. तेव्हां या कराचा निषेध करण्यासाठीं व्यापाऱ्यांनीं आपलीं सर्व दुकानें बंद ठेवण्याचा कट करून राष्ट्रांतील सर्व देवघेवच बंद केली. याच सुमारास डच लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नास नेदर्लंडमधील डच लोकांचा पहिला विजय. पहिल्यानेंच जय मिळाला; व हा जय म्हणजे स्पॅनिश लोकांच्या ताब्यांत असलेलें बिली नांवाचें एक शहर डच लोकांनीं काबीज करणें हेंच होय ! त्यांच्या या विजयामुळे हॉलंड वझीलंड या दोन प्रांतांतील लोकांना बंड करण्याची स्फूर्ति झाली ! चार वर्षांपूर्वी अशाप्रकारचें अंतःस्थ बंड होऊन तेथील लोकांपासून आपणास