पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें . ] डच लोकांचा स्वराज्यप्राप्तीचा प्रयत्न ७९ फिलीप सूड घेण्याचा निश्चय करतो. प्रॉटेस्टंटपंथीय लोकांच्या या दंग्यापासून फिलीपनें कांहींच बोध न घेतां उलट त्यांचा सूड घेण्याचाच निश्चय केला. नेदर्लंडमधील जनते- च्या विनंतीप्रमाणें तेथील जुलमी धर्मकोर्टें काढून टाकून लोकांना पूर्ण धार्मिक सवलत दिली असती तर सर्व कांहीं सुरळीत रीतीनें चाललें असतें. परंतु फिलीप हा स्वतःस रोमन कॅथ- लीक धर्माचा कट्टा अनुयायी समजत असल्यामुळे त्याच्या डोक्यांत हा विचार देखील आला नाहीं ! मार्गारेटनें शांततेच्या धोरणानें तेथें केलेली स्थिरस्थावरता यास न आवडून, तेथील लोकांचा सूड घेण्यासाठीं आल्व्हा नांवाच्या एका सरदारास त्यानें तेथे पाठवून मार्गारेटला परत बोलाविलें. सरदार आल्व्हा आपल्या धन्याप्रमाणेंच रोमन कॅथलीक पंथाचा कवा अनुयायी होता. १५६७ मध्ये आपल्या दहा हजार फौजेनिशीं, नेदर्लंडमधील लोकांना त्यांनी नुकत्याच केलेल्या बंडाबद्दल शिक्षा करण्यासाठीं तो ब्रुसेल्स शहरीं येऊन दाखल आल्व्हाची फौज दाखल होतांच वुइल्यमनें त्याचा बेत ओळखून तेथून पळ काढला. ब्रुसेल्स येथें आल्यावर कडक व निष्ठुर असे उपाय योज- ण्यास आव्हानें सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या दंग्यांत ज्यांनीं भाग घेतला होता त्या सर्वांचा शोध करण्यासाठीं एक मंडळ स्थापन करण्यांत आलें. या मंडळाच्या प्रेरणेनें हजारों माणसांस पोलीसकडून पकडण्यांत. येऊन फांसावर लोंबकळावें लागलें. कित्येकांना आपल्या प्राणसंरक्षणार्थ देशत्याग करावा लागला. या मंडळातर्फे नेदर्लंडमधील डॉगमाँट नांवाच्या लोकपक्षीय पुढाऱ्यास पकडण्यांस येऊन त्याचा शिरच्छेद करण्यांत आला. झाला. नेदर्लंडमध्यें असा हाहा:कार सुरू असतां वुइल्यम ऑफ ऑरेंज नांवाचा दुसरा एक लोकपक्षीय पुढारी, नेदर्लंडमधील लोकांच्या स्वातंत्र्या- साठी कोणकोणते प्रयत्न करावेत यांचा विचार करण्यांत मग्न होता. त्यानें चिकाटीनें व दृढ निश्वयानें प्रयत्न करून, आपल्या राष्ट्रास स्वातंत्र्य