पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण नेदर्लंडचा प्रदेश समुद्रसपाटीपासून सखल असल्यानें, समुद्रापासून या नेदर्लंडची भौगोलिक परिस्थिति. प्रांताचें संरक्षण करण्यासाठी मोठमोठालीं धरणें बाधणे अत्यावश्यक होतें; तद्वतच हाईन व शेल्डट या नद्याही या प्रांतांतून वहात असल्यानें, सर्व प्रदेश पूर येऊन जलमय होऊं नये म्हणून, मोठमोठाले पाटबंधारे काढून त्यायोगें नद्यांचें पाणी सर्व प्रदेशांत सारखें पसरून देणेंही अत्यावश्यकच होतें. नदीच्या पाण्यापासून प्रांताची नासाडी होऊं नये म्हणून जरी पहिल्याप्रथम हे कालवे बांधण्यांत आले, तरी या कालव्यांमुळे ठिकठिकाणीं बागायती जमिनी तयार झाल्या असून माल लवकर व जलद नेण्याच्या कामींही त्यांची चांगली मदत होत आहे हें नेदर्लंडचे सुदैवच होय ! पांचव्या चार्लसच्या अमदानींत धार्मिक बाबीखेरीज इतर सर्व बाबतींत या प्रांताची उन्नति झाली असून येथील प्रजाही संतुष्ट असे; परंतु प्रॉटेस्टंट पंथाची लाट या प्रांतांत पसरल्यावर तिचा निःपात करण्यासाठीं चार्लसला कडक उपाय योजावे लागले ! जर्मनी- मध्ये जर्मन संस्थानिकांचें प्रस्थ बरेंच असल्यानें - तेथील धर्मसुधारणेची चळवळ पार दडपून टाकणे कठीण होतें. परंतु नेदर्लंडवर त्याचें पांचव्या चार्लसच्या अमदानीतील नेदर्लंड. पूर्णपणें वर्चस्व असल्यानें, तेथें आपला प्रयत्न - पूर्णपणें सिद्धीस जाईल असें चालसला वाटत असल्यास त्यांत कांहींच नवल नव्हतें. ल्यूथरच्या धर्मपंथास येथें पहिल्यापासूनच विरोध करण्यांत आला. स्पेनमध्ये अस्तित्वांत असलेल्या जुलमी धर्मकोटीची येथें प्राण- प्रतिष्ठा करण्यांत आली; व धर्मसुधारणेमध्यें भाग घेणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करणें, त्यांना तुरुंगांत टाकणें, व अपराधाबद्दल जिवंत जाळणें वगैरे जुलमी प्रकारही दररोज घडूं लागले ! परंतु, अशाप्रकारें प्रॉटेस्टंट पंथीय लोकांचा छळ चालला होता, तरी धर्म-