पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें. ] डच लोकांचा स्वराज्यप्राप्तीचा प्रयत्न. ७७ सुधारणेचें बीज त्या प्रांतांतून नष्ट झालें नाहीं; इतकेंच नव्हे तर ल्यूथरच्या धर्मसुधारणेच्या मतास कॅल्व्हीनच्या जोरदार मताची जोड मिळाल्यामुळे धर्मसुधारणेच बीज चार्लसकडून कडक उपाय अमलांत येत होते तरी तेथें रुजतच चाललें. १५५५ मध्ये बादशहा पांचवा चार्लस यानें आपल्या बादशाही - `पदाचा व राजपदाचा त्याग करून आपला मुलगा फिलीप यास स्पेनच्या राज्यावर अधिष्ठित करून नेदर्लंडप्रांत त्याच्या ताब्यांत दिला. आपल्या पित्यापेक्षां २ ऱ्या फिलीपचे विचार अधिकच अनुदार होते; व तो . स्वतःस रोमन कॅथलीक पंथाचा कट्टा अनुयायी समजत असल्यानें प्रॉटे- स्टंट पंथाची चळवळ वाटेल ते उपाय योजून पार चेपून टाकण्याचा त्याने जणूं काय विडाच उचलला ! फिलीपचा असा निश्चय असल्यानें, त्याच्या अमदानीत धर्मकोर्टाचें काम वा लागून पुष्कळ प्रॉटेस्टंट पंथीय लोकांस धर्मसंरक्षणाकरितां स्वतःस जाळून घेणें भाग पडलें. यावेळीं नेद- लंडमधील बहुजनसमाजाचा कल जरी रोमन कॅथलीक पंथाकडेच होता, तरी धर्मसुधारणेची चळवळ पार नाहींशी करण्यासाठीं राज्यकर्त्याी- कडून होणारीं जुलमी व अन्यायाचीं कृत्यें पाहून फिलीपबद्दल तिटकारा वाटू लागला व प्रॉटेस्टंटपथीय २ या फिलीपच्या जुलमी कृत्याविरुद्ध लोकमत. • त्यांस दुसऱ्या - लोकांबद्दल उत्तरोत्तर त्यांची सहानुभूति वाळूं लागली. यावेळी दुसऱ्या फिलीपनें फ्रान्सचा पूर्ण पराभव करून नेदर्लंड व इटलींतील मीलन या दोन्ही प्रांतांवर फ्रान्सचा कांहीं हक्क नाहीं असें कॅटो-कॅमब्रेझीच्या ( १५५९ ) तहांत कबूल करून घेतलें होतें. अशारीतीनें फ्रान्ससंबंधीं व्यवस्था लावल्यावर आपली सावत्र बहीण पामरची मार्गरेट हिला नेदर्लंडप्रांताची सुभेदारी देऊन १५५९ मध्यें फिलीप स्पेनला परत गेला.