पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. डच लोकांचा स्वराज्यप्राप्तीचा प्रयत्न. नेदर्लंड प्रांताचें पूर्ववृत्त. स्वप्रत हॉलंड व बेलजम राष्ट्रांनीं जो प्रांत व्यापला जातो 'त्यास पूर्वी नेदर्लंड किंवा सखल प्रदेश असें म्हणत असत. मध्ययुगामध्ये या प्रातांत लहान लहान अशीं पुष्कळ संस्थानें असून तीं एकमेकांपासून स्वतंत्र होतीं. मध्ययुगाच्या शेवटी शेवटीं फ्रान्स व जर्मनी या दोन राष्ट्रांच्या सरहद्दीवर असलेल्या बर्गेडीच्या संस्थानिकानें आपल्या राज्याशीं हा नेदर्लंड प्रांत जोडून त्याचें एक संघटित संस्थान बनविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा हेतु सिद्धीस जाण्यापूर्वीच १४७७ साली बर्गेडीचा राजा ' चार्लस धी बोल्ड ' याच्या मृत्यूनें बर्गेडीचें राज- घराणें संपुष्टांत आलें. यानंतर फ्रान्सचा राजा ११ वा लुई यानें बर्गेडीचें संस्थान आपल्या राज्यास जोडून टाकलें. पण नेदर्लंडप्रांत मात्र चार्लस धी बोल्ड याची एकुलतीएक मुलगी मेरी हिचा बादशहा मॅग्झीमीलन याच्याशीं विवाह झाला असल्यानें, आस्ट्रियावर राज्य करणाऱ्या हॅप्सबर्ग 'घराण्याच्या ताब्यांत गेला; व अशा रीतीनें युरोमध्यें धर्मसुधारणेची चळ- वळ सुरू असतां या प्रांतावर बादशहा पांचवा चार्लस याचे वर्चस्व होतें. नेदर्लंड प्रांतांत केल्टस् व ट्यूटन्स अशा दोन्हीं जातींचे लोक रहात असत. केल्ट जातीची लोकसंख्या ट्यूटन्सपेक्षां कमी होती, व हल्लीं जेथें बेलजम आहे त्या प्रदेशांत मुख्यत्वेंकरून यांची वस्ती असून · त्यांची भाषा फ्रेंच होती. ट्यूटन्सची वस्ती सांप्रत हॉलंड देश ज्या ठिकाणी आहे तेथें असून ते जर्मन भाषा बोलत.