पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरण ५ वें. ] स्पॅनिश जहाजें चाललीं असतां समुद्रांत मोठे वादळ होऊन, बिचाऱ्या स्पॅनिश जहाजांचा विनाश झाला ! अजिंक्य समजल्या जाणाऱ्या स्पेनच्या आरमाराचा पराभव झाल्या- वर इंग्लंडचें परचक्रापासून संरक्षण झालें, प्रॉटेस्टंट पंथाचा पूर्ण विजय झाला, व स्पेनची आरमारी सत्ता रसातळास जाऊन इंग्लंडनें समुद्रावरील वर्चस्व पटकावलें. या वेळेपासून समुद्रावरच आपल्या महत्त्वाकांक्षेस वाव आहे हें इंग्लंडच्या लक्षांत आलें. इंग्लिश लोकांनीं युरोपखंडांत प्रदेश मिळविण्याची आशा सोडून देऊन महासागराच्या पलीकडे असलेल्या इतर खंडामध्यें व्यापार करावा व आपल्या वसाहती स्थापन कराव्यात अशी महत्वाकांक्षा मनामध्यें बाळगली. सांप्रतकाळीं त्यांची ही महत्त्वा- कांक्षा सफळ झाली असून आज पांचीही खंडांत ब्रिटिश साम्राज्य पस- रलेलें आहे. इलिझाबेदच्या अमदानींत पूर्वेकडील राष्ट्रांशीं व्यापार करण्या- साठीं ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होऊन ( १५९९ ) इंग्लंडचा व्यापार वृद्धिंगत पावला, व या व्यापारासोबत इंग्लंडची राहणी देखील उच्च दर्जाची होऊन इंग्लंडची उत्तरोत्तर भरभराट होत गेली ! या अमदानींत शेक्स्पीयरसारखा जगद्विख्यात कवि निर्माण झाला व त्यानें आपल्या नाट्य- ग्रंथांनी इंग्लंडचें नांव अजरामर करून ठेवलें ! अशा प्रकारें इलिझाबेदच्या अमदानीत इंग्लंडची सर्व बाजूंनीं उन्नति झाल्यानें तिच्या अमदानीस ' सुवर्णयुग' म्हणतात तें अगदीं यथार्थ होय !