पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें . ] ट्यूडर घराण्याच्या अमदानींतील इंग्लंड. ७३ स्पेन राष्ट्र उठलें असतांना खास इंग्लंडमध्यें, रोमन कॅथलीक पंथाच्य कांहीं अनुयायांनीं, मेरीचा पक्ष घेऊन कट रचला असल्यामुळें, इलिझा- वेदनें लागलींच मेरीची चौकशी करवून तिला राजद्रोहाबद्दल फांशीची शिक्षा दिली. ( १५८७ ). इकडे २ या फिलीपनें इंग्लंडचा फडशा पाडण्यासाठी १३२ जहा- जांचें एक मोठें बलाढ्य आरमार तयार करवून त्यास मोठ्या अभिमानानें 'अजिंक्य आरमार' असें नांव दिलेलें होतें. इंग्लंडचा पराभव करून, स्पेनचें बलाढ्य आरमार. प्रॉटेस्टंट पंथाची पाळेंमुळें खणून टाकण्यासाठीं हैं आरमार उद्युक्त झालेलें पहातांच इंग्लंडचें आयुष्य संपलेसें सर्वांस वाटूं लागलें ! परंतु या परचक्रा- पासून आपल्या राष्ट्राचें संरक्षण करण्यासाठी, इंग्लिश लोक आपल्यां - तील धार्मिक मतभेद विसरून स्वदेशाभिमानानें प्रेरित होत्साते शत्रूंशीं तोंड देण्यासाठी सज्ज झाले ! स्पेनच्या आरमाराशी तोंड देण्यासाठीं आपलें सर्व सामर्थ्य खर्च करून इंग्लंडने १९७ जहाजांचें एक आरमार तयार ठेविलें. इंग्लिश जहाजें स्पॅनिश जहाजांपेक्षां जरी आकाराने लहान होतीं, तरी त्यांवरील युद्धसामग्री जय्यत तयार असल्यामुळे स्पॅनिश आरमाराशीं त्यांना टक्कर देतां आली. १५८८ च्या जुलै महिन्यांत स्पॅनिश जहाजें दिसूं लागतांच, रात्रींच्या वेळीं कांहीं लहान लहान इंग्लिश बोटींनी शत्रूंच्या गोटांत शिरून आगीचा भडका उडवून दिला. या अकस्मात् गोष्टीमुळें स्पॅनिश आरमारांमध्यें गोंधळ माजून राहिला, व इकडे स्पॅनिश जहाजें धांदलींत असतां इंग्लिश जहाजांनीं स्पेनच्या जहाजांवर अचानक हल्ला केल्यामुळे स्पॅनिश आरमारांची फारच दुर्दशा उडाली ! इकडे इंग्लिश खाडीमध्यें इंग्लिश जहाजांनीं नाकेबंदी केली असल्यामुळे स्पॅनिश जहा- जांस एकदम स्पेनकडे निघून जाणेही अशक्यच झालें; तेव्हां आत स्कॉट- लंडला वळसा देऊन परत गेल्यावांचून गत्यंतर नाहीं हें पाहून त्या दिशेनें स्पेनच्या बलाढ्य आरमाराचा पराभव. ५