पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण प्रकारें सलोख्याचे संबंध नसतांना, १५६७ मध्यें बॉथवेल नांवाच्या एका सरदारानें डार्नलेचा वध केला. या वधाशीं मेरीचें कांहीं अंग होतें कीं नाहीं हें सांगतां येणें शक्य नाहीं, परंतु मेरीनें बॉथवेल यास त्याच्या कृतीबद्दल कांहीं शिक्षा केली नाहीं इतकेंच नव्हे, तर उलट थोडयाच दिवसांनीं त्याच्याशी लग्न केल्यामुळें, ती वधाशीं सामील असावी या शंकेस बरीच पुष्टि येते एवढें मात्र खरें ! मेरी इलिझाबेदच्या मेरीची ही कृति पहातांच, स्कॉटिश लोकांनीं तिच्याविरुद्ध बंड उभारलें. मेरीनें या बंडाच्या प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; परंतु तिचा प्रयत्न निष्फळ ठरून, आतां कोणाकडूनही मदत मिळण्याचा संभव नाहीं पाहून इलिझाबेदचा आश्रय घेण्यासाठीं तिनें इंग्लंडकडे पळ काढला ( १५६८ ). पण, तेथें गेल्यावर बिचाऱ्या मेरीला इलिझाबेदकडून आश्रय मिळाला नाहीं इतकेंच नव्हे, तर इलिझाबेदनें तिला १९ वर्षे कैदेत ठेवलें व शेवटी तिच्यावर राजद्रोहाचा अपराध शाबीत गेल्यावर तिला फांशीं दिलें ( १५८७ ). आश्रयास येते- १५६८. आपल्याकडे आश्रय मागण्यास आलेल्या आपल्या दूरच्या बहिणी- शीं इलिझाबेदचें अशा रतिनें वागणें जरा चमत्कारिकच भासेल; परंतु तिच्या अशा प्रकारच्या कृतीचें नीट कारण लक्षांत येण्यास आपणां त्या वेळच्या परिस्थितीकडेच लक्ष दिलें पाहिजे. त्यावेळीं धर्मसुधारणेची चळवळ हाणून पाडण्याचे, पोप व स्पेनचा राजा २ रा फिलीप यांचे प्रयत्न सुरू होते. नेदर्लंडमधील प्रॉटेस्टंट पंथीय डच लोकांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नांत, चिमु- कल्या इंग्लंडने पहिल्यानें द्रव्यद्वारा व नंतर आपलें सैन्य पाठवून मदत केल्यामुळे तर स्पेनचा राजा दुसरा फिलीप याची तळव्याची आग मस्तकास जाऊन पोहोंचली ! चिमुकल्या इंग्लंड बेटाचा नामशेष करून टाकण्याचा त्यानें निश्चय केला ! अशा प्रकारें इंग्लंडविरुद्ध स्पेन व इंग्लंड यांमधील वैमनस्य.