पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • ५ वें. ]

ट्यूडर घराण्याच्या अमदानींतील इंग्लंड. ७१ `च्या सिंहासनावर आरूढ झाली असल्यानें, स्कॉटलंडच्या व इंग्लंडच्या अंतः- स्थ बाबीकडे लक्ष देण्यास तिला अवसरच नव्हता ! मेरीची चमत्कारिक परिस्थिति. २ रा फॅन्सीस मरण परंतु १५६० मध्ये तिची स्थिति एकदम फारच चमत्कारिक झाली ! कारण याच वर्षी तिचा पति पावल्यामुळे फ्रान्समधील तिची सत्ता संपुष्टांत आली होती, व इंग्लंडमध्यें इलिझाबेद सिंहासनारूढ झाली असल्यामुळे तिला इंग्लंडच्या गादीवरही आपला हक्क सांगतां येईना; तेव्हां आतां स्कॉटलंडकडेच कायतें तिला जातां येणें शक्य होतें, परंतु याच सुमारास तिची आई स्कॉटलंडमध्यें मरण पावल्यामुळे तिची स्थिति फारच चमत्कारिक झाली. मेरीला विकट परिस्थितीशी झगडावें लागतें. स्कॉटलंमध्यें मेरीला बिकट परिस्थितीशी झगडावें लागलें. तेथील सरदार लोक तिच्या सत्तेस विरोध करीत असून, ती स्वतः रोमन कॅथलीक पंथाची असल्यामुळें स्कॉटलंडमधील प्रॉटेस्टंट पंथीय बहुजनसमाजास तिच्या हेतूबद्दल सहाजिकच शंका येई. ती यावेळीं लहान म्हणजे १९ वर्षां- चाच होती, तेव्हां स्कॉटलंडमध्ये आपले वजन बसविण्यास कोणतें धोरण ठरवावें याविषयीं तिला कांहींच अटकळ न करतां आल्यास त्यांत कांहींच नवल नव्हतें ! इलिझाबेदप्रमाणें ती "धोरणी असती, तर तसल्या परिस्थितींतही तिनें स्कॉटलंडवर आपले वर्चस्व बसविलें असतें. स्कॉटलंडमध्यें आल्यावर तिनें डार्नले नांवाच्या आपल्या एका नातलगाशीं विवाह केला. परंतु या गृहस्थाचा स्वभाव गर्विष्ठे, व हेकेखोर असल्यामुळे या विवाहापासून तिला सुख न होता, उलट त्रास मात्र झाला. यानंतर डार्नलेनें मेरीच्या विश्वासांतील रिझाओ नांवाच्या एका इटालियन सेक्रेटरीचा वध केला असल्यामुळे तर तिला डालेबद्दल फारच तिटकारा वाटूं लागला होता. मेरी व डार्नले यांच्यामध्यें अशा-