पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण पंथीय लोकांनी मान्यता दाखविली पाहिजे असें जाहीर केलें. अशाप्रकारें प्रॉटेस्टंटपंथाकडेच इलिझाबेदचा जरी कल होता, तरी तिनें पूर्वीच्या -राज्यकर्त्यांप्रमाणें रोमन कॅथलीक पंथाच्या अनुयायांचा छळ केला नाहीं; तर त्यांना प्रॉटेस्टंट पंथाप्रमाणे चाललेली प्रार्थना न ऐकण्याबद्दल थोडासा दंड भरावा लागे इतकेंच ! त्यावेळच्या एकंदर परिस्थितीच्या मानानें तिनें भिन्नपंथीय लोकांस फारच सवलतीनें वागविलें होतें असें म्हणावयास पाहिजे. प्युरीटन व सेपराटिस्ट पंथ. धार्मिक बाबतींत इलिझाबेद अशारीतीनें संथपणे आचरण करीत आहे हें न आवडून जहाल प्रॉटेस्टंट पंथीय लोकांनीं आपला एक निराळाच पंथ स्थापन केला ! थोडक्याच दिवसांत या पंथांतही प्युरीटन व सेपराटिस्ट असे दोन पंथ उद्भूत झाले. प्युरीटन पंथाच्या अनुयायांस इलि- झाबेदनें स्थापलेल्या पंथाची व आपली तडजोड होईल अशी आशा व होती. परंतु सेपराटिस्ट पंथाचे लोक ज्वलज्जहाल असल्यामुळे ते कसल्याच प्रकारची तडजोड करण्याच्या विरुद्ध असत ! त्यांना इंग्लंडचें प्रॉटेस्टट चर्च म्हणजे रोमन कॅथलीक चर्चप्रमाणेंच टाकाऊ वाटत असे. तेव्हां हे दोन्ही पक्षही इंग्लंडच्या एपिस्कोपेलियन पंथापासून अलग असल्यामुळे रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांप्रमाणें यांनाही दंड भरावा लागे. इलिझाबेदनें आपलें नेमस्त धोरण ठरवून इंग्लंडमध्यें प्रॉटेस्टंट 'पंथाचा प्रसार करण्याची खटपट चालविली असल्यामुळे, इंग्लंडबद्दल आपण कोणतें धोरण जाहीर करावें याचीही पोपला शंका वाटूं लागली; परंतु इलिझाबेदच्या एकंदर धोरणाचा नीट विचार केल्यावर इंग्लंडमध्यें प्रॉटेस्टंट पंथाचीच पूर्णपणें स्थापना व्हावी असा तिचा बेत आहे हें पोपच्या लक्षांत येतांच त्यानें एक पत्रक काढून तिला धर्मबहिष्कृत केलें; तर इकडे कॅथलीक धर्माचा कट्टा भक्त २ रा फिलीप यानेंही इंग्लंड- विरुद्ध आपले धोरण जाहीर केलें... "