पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें . ] ट्यूडर घराण्याच्या अमदानीतील इंग्लंड. ६७ अशाप्रकारें सर्व बाबतींत इंग्लंडची उन्नति झाल्यामुळे तिच्या अमदानीस सुवर्णयुग असें नांव देतात तें यथार्थ होय ! इलिझाबेदच्या अमदानींत इंग्लंडनें जें वैभव संपादन केलें, तिची कर्तबगारी, मुत्सद्देगिरी व सर्व गोष्टींचें योग्य प्रकारें आकलन कर- ण्याची ताकद या सर्व गोष्टी कारणीभूत झाल्या असें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु तिच्या अंगीं असलेल्या या गुणसमुच्चयानें व तिनें इंग्लंडला संपादन करून दिलेल्या वैभवानें तिच्या अंगचे कांहीं दुर्गुणही जरी झांकले जातात; तरी या दुर्गुणांमुळे तिच्या अंगी असलेल्या गुणसमुच्चय मात्र कमीपणा येत नाहीं हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. तिनें आपल्या अमदानींत एकंदर परिस्थितीचा योग्य विचार करून एखाद्या कसलेल्या मुत्सद्याप्रमाणें आपलें धोरण ठरवितांना जें नैपुण्य दाखविलें तें खरोखरीच वाखाणण्यासारखें आहे. इलिझावेदचें नेमस्त धोरण. या वेळी सर्वांत महत्त्वाच्या अशा समजल्या जाणाऱ्या धार्मिक बाबीं-: संबंधानें तिनें तटस्थ वृत्ति व उदार धोरण दाखवून आपल्याकडे दोन्ही पक्षांचें चित्त ओढून घेतलें. पूर्वीच्या राज्यकर्त्यांप्रमाणें धार्मिक मतभिन्नते- मुळे तिनें कोणाचा छळ केला नाहीं, म्हणूनच तिच्याबद्दल. सर्वास आदर वाटे. इलिझाबेदनें कोणाचा विनाकारण छळ न. करतां इंग्लंडमध्ये प्रॉटेस्टंट पंथ स्थापन कर- ण्याचा प्रयत्न केला. पहिल्याप्रथम मेरीच्या अम- दानींत पोपचें इंग्लंडवर प्रस्थापित करण्यांत आलेलें वर्चस्व नाहींसें करण्यासाठीं, इंग्लंडच्या राज्यकर्त्यांस धार्मिक बाबींत मुख्या- ध्यक्ष करणारा कायदा पुनरपि मंजूर करण्यांत आला ( १५५९ ); याखेरीज इंग्लंडमधील सर्व चर्चमधून एकाच प्रकारची प्रार्थना चालविण्यांत यावी म्हणून एक कायदा पास करण्यांत आला. यानंतर ६ व्या एडवर्ड- च्या अमदानीत तयार झालेल्या ४२ कलमांपैकीं तीन कलमें कमी करून ३९ कलमांचें एक पुस्तक प्रसिद्ध करण्यांत आले व त्यास सर्व प्रॉटेस्टंट-