पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें . ] ट्यूडर घराण्याच्या अमदानीतील इंग्लंड. ६९ परिस्थिति. इलिझाबेदच्या कारकीर्दीत स्कॉटलंडच्या ऐतिहासिक घालमेलींचा बराच संबंध असल्यामुळें स्कॉटलंडच्या इतिहासाकडे आपण लक्ष्य घातलें. पाहिजे. स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधील स्कॉटलंडमधील वैर तर कितीतरी शतकांपासूनचें असून मध्ययुगांत स्कॉटलंडचे राजे इंग्लंडवर व इंग्लंडचे राजे स्कॉटलंडवर वरचेवर हल्ला करीत ! परंतु या दोन राष्ट्रांमधील हा वैरभाव नष्ट होऊन दोन्ही राष्ट्रांमध्यें सलोख्याचे संबंध असावेत या हेतूनें इंग्लंडचा राजा ७ वा हेन्री यानें आपली मुलगी मार्गरेट ही स्कॉटलंडचा राजा ४ था जेम्स यास दिली होती; परंतु इतकें - ही करून या राष्ट्रांमधील वैर नष्ट न होतां ४ था जेम्स व ५ वा जेम्स हे दोन्ही स्कॉटलंडचे राजे इंग्लंडवर हल्ला करीत असतांनाच ठार मारले गेले. १५४२ मध्यें पांचवा जेम्स मारला गेल्यावर स्कॉटलंडच्या गादीवर पांचव्या जेम्सची तान्ही मुलगी मेरी हीच वारस होती. स्कॉटलंडप्रमाणें इंग्लंडच्या राजघराण्याशीं या लहानग्या मेरीचा संबंध असल्यामुळे तिला इंग्लंडची गादी मिळण्याचाही संभव येईल असेंही कित्येकांस वाहूं लागलें. १५५८ मध्ये इंग्लंडवर राज्य करीत असलेली मेरी मर पावतांच इंग्लंडच्या गादीवर स्कॉटलंडची राणी मेरी हिचाच जास्त हक्क आहे असें रोमन कॅथलीक पंथाच्या अनुयायांस वाटत होतें. कारण ८ व्या हेन्रीनें कॅथराईन राज्ञीशीं काडी मोडून ॲन बोलीनशीं लग्न केल्यानें तिच्यापासून झालेल्या इलिझाबेदचा इंग्लंडच्या गादीवर खरा हक्क नव्हता असें त्यास वाटत होतें. तेव्हां इंग्लंडची राणी इलिझाबेद, व स्कॉटलंडची राणी मेरी यांचे अशाप्रकारचे संबंध असल्यामुळे स्कॉटलंडच्या त्यावेळच्या परिस्थितीकडे लक्ष देणें अत्यावश्यक आहे. स्कॉटलंडची राणी मेरी. स्कॉटलंडचा राजा ५ वा जेम्स हा मारला गेला, तेव्हां स्कॉटलंड-