पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ मेरीची जुलमी कृत्यें. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण मेरीनें अशाप्रकारचीं कृत्ये करून केवळ आपल्या राष्ट्रांतील प्रॉटे- स्टंट पंथाच्या अनुयायांचीच अप्रियता संपादन केली असे नव्हे, तर स्पेनचा राजा दुसरा फिलीप याच्याशी लग्न करून सर्व राष्ट्राचीच अ- प्रियता संपादन केली असें म्हणण्यास हरकत नाहीं. आपल्या कृतींबद्दल राष्ट्रांतील सर्व मंडळी असंतुष्टः आहेत हें पहाताच तिनें पुष्कळांना क्रूरपणें फांशी दिलें. मेरीचें स्पेनचा राजा २ रा फिलीप याच्याशी लग्न झालें असल्यानें इंग्लंडला स्पेनच्या वतीनें, युरोपियन लढायांमध्यें विनाकारण भाग घ्यावा लागला, व यामुळे १५५८ मध्ये इंग्लंडचें फ्रान्सच्या किनाऱ्यावर अस- लेलें कॅले हें ठिकाण गमावलें. कॅले हैं ठिकाण गेल्यापासून तत्कालीन इंग्लिश लोकांना व राज्ञी मेरीला हळहळ वाटत असली, तरी दूरवर विचार केला असतां, कॅले हैं ठिकाण गेल्यापासून इंग्लंडचा अप्रत्यक्ष एकंदरींत फायदाच झाला असे आपणास दिसून येईल ! कारण- फ्रान्सच्या किनाऱ्यावर असलेलें हें ठिकाण हातचे गेल्यानंतर युरोप खंडांत आपलें साम्राज्य विस्तृत करण्याची हांव इंग्लंडने सोडून देऊन, इ आपल्या वसाहती स्थापन करून तिकडे आपले साम्राज्य विस्तृत करण्याची महत्त्वाकांक्षा इंग्लंडनें धरली, व त्यामुळे इंग्लंडचा फायदाच झाला. ( इलिझाबेद १५५८ ते १६०३). मेरीनंतर ॲनबोलिनची मुलगी इलिझाबेद गादीवर आली... हिच्या अमदानीत इंग्लंडचा सर्व बाबतींत उत्कर्ष होऊन इंग्लंडनें अद्वितीय कीर्ति संपादन केली. या अमदानीत इंग्लंडमध्ये प्रॉटेस्टंटपथ पूर्णपणें प्रस्थापित होऊन स्पेनसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या आ इंग्लंडने पराभव केल्यामुळे इंग्लंडचें समुद्रावरील वर्चस्व वाढत गेलें. तसेंच या अमदानींत शेक्सपियरसारखा जगद्विख्यात नाट्यकवि निर्माण होऊन त्यानें आपल्या नाट्यकृतीनें इंग्लंडचें नांव अजरामर केलें.